अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:28 AM2019-02-14T01:28:32+5:302019-02-14T01:30:48+5:30

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात बुधवारी दुपारी २ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी सर्वप्रथम पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात जमा झाल्या.

Anganwadi workers' funeral | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चक्काजाम

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चक्काजाम

Next
ठळक मुद्देशेकडोंना केले स्थानबद्ध : विविध मागण्यांसाठी इंदिरा गांधी चौकात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात बुधवारी दुपारी २ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी सर्वप्रथम पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कला दालनात जमा झाल्या. त्यानंतर इंदिरा गांधी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. इंदिरा गांधी चौकात काही वेळ चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनात जवळपास ८०० अंगणवाडी महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. सरकार विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला. चारही मार्गावरची वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती. त्यानंतर पोलिसांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व अंगणवाडी कर्मचाºयांना स्थानबध्द केले. सर्व अंगणवाडी महिलांना पोलीस स्टेशनमध्ये जमा झाल्या. जवळपास ८०० अंगणवाडी कर्मचारी पोलीस स्टेशनच्या आवारात जमा झाल्याने पोलीस स्टेशनमध्ये गर्दी झाली होती.
आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे जिल्हा संघटक देवराव चवळे, विनोद झोडगे, माजी जि.प. सदस्य अमोल मारकवार, डॉ. महेश कोपुलवार, सिटूचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे, राधा ठाकरे, जगदिश मेश्राम, मिनाक्षी झोडे, बसंती अंबादे, दुर्गा कुर्वे, अनिता अधिकारी, मिरा कुरंजेकर, रेखा जांभुळे, कौशल्या गोंधोळे, जहरा शेख, ज्योती कोमलवार, रूपा पेंदाम, शिवलता बावणथडे यांनी केले. काही वेळानंतर सर्व अंगणवाडी कर्मचाºयांची सुटका करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

महामार्गाच्या कामामुळे रस्ता झाला जाम
इंदिरा गांधी चौकातून धानोरा मार्गावर एका बाजूच्या रस्त्याचे खोदकाम केले असल्यामुळे एकाच बाजुने वाहतूक सुरू आहे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या या मोर्चामुळे या मार्गाने जाणाºया-येणाºया वाहनांची चांगलीच कोंडी झाली होती. रुग्णवाहिकेसारख्या आकस्मिक सेवेतील वाहनांनाही याचा फटका बसला. भविष्यात हे टाळण्यासाठी या रस्त्याचे काम सुरू आहे तोपर्यंत या मार्गाने मोर्चा किंवा अन्य आंदोलनांना परवानगी देऊ नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत होत्या.

Web Title: Anganwadi workers' funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.