झाड पाडून नक्षल्यांनी अडवला आलापल्ली-भामरागड मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 10:31 AM2019-11-28T10:31:05+5:302019-11-28T10:31:59+5:30

येत्या २ ते ८ डिसेंबरदरम्यान पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) स्थापना दिवस सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले आहे.

The Alapalli-Bhamragad route was obstructed by Naxalite | झाड पाडून नक्षल्यांनी अडवला आलापल्ली-भामरागड मार्ग

झाड पाडून नक्षल्यांनी अडवला आलापल्ली-भामरागड मार्ग

Next
ठळक मुद्देपीएलजीए स्थापना दिवस पाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: येत्या २ ते ८ डिसेंबरदरम्यान पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) स्थापना दिवस सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. तशा आशयाचे पत्रक लावून त्यांनी गुरुवारी सकाळी आलापल्ली-भामरागड मार्गावर झाड आडवे टाकून नागरिकांना त्यात सहभागी होण्यास सांगितले आहे. पेरमिलीपासून २ कि.मी. अंतरावर अरेंदा फाट्यावर नक्षल्यांनी हे बॅनर लावले व काही पत्रके तेथे टाकली होती. केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध दर्शवत त्यांनी नागरिकांना संघटनेत सामील होण्याचेही आवाहन केले आहे. पेरमिली एरिया कमिटीच्या नावाने हे पत्रक व बॅनर लावले आहे.

Web Title: The Alapalli-Bhamragad route was obstructed by Naxalite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.