तंत्रज्ञानच्या युगात समाज संघटन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:24+5:30

संताजी जगनाडे महाराज यांच्या ३३१ व्या पुण्यतिथी निमित्य आरमोरी येथे साई दामोदर मंगल कार्यालयात तेली समाज मेळावा व वर-वधु परिचय मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद््घाटन तेली समाज महासंघाचे अध्यक्ष बबनराव फंड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे होते.

In the age of technology society needs organization | तंत्रज्ञानच्या युगात समाज संघटन आवश्यक

तंत्रज्ञानच्या युगात समाज संघटन आवश्यक

Next
ठळक मुद्देतेली समाजाचा आरमोरीत मेळावा : बबनराव फंड यांचे प्रतिपादन; समाजाच्या समस्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज भरकटला जात आहे. सोशल मीडियाच्या अधिक वापरामुळे समाजात संबंध दुरावलेले असल्याचे दिसत आहे. यामुळे समाज संघटनावर भर दिला पाहिजेत. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय संस्कृती टिकली पाहिजे. याकरिता गावोगावी समाज मेळावे घेऊन समाज संघटन केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र तेली समाज महासंघाचे अध्यक्ष बबनराव फंड यांनी केले आहे.
संताजी जगनाडे महाराज यांच्या ३३१ व्या पुण्यतिथी निमित्य आरमोरी येथे साई दामोदर मंगल कार्यालयात तेली समाज मेळावा व वर-वधु परिचय मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद््घाटन तेली समाज महासंघाचे अध्यक्ष बबनराव फंड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे होते.
प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका छबूताई वैरागडे, आरमोरी पं.स. उपसभापती विनोद बावनकर, भगवान ठाकरे, बाबुराव कोहळे, परसराम टिकले, डॉ. सुरेश रेवतकर, प्राचार्य पी. आर. आकरे, आरमोरी तेली समाजाचे अध्यक्ष बुधाजी किरमे, डॉ. संजय सूपारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त उपसभापती विनोद बावनकर, नगरसेविका छबूताई वैरागडे, भगवान ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून प्रा. गंगाधर जुआरे, गोविंदराव बोडणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रस्ताविक द्वारका प्रसाद सातपुते, संचालन प्रा. प्रदीप चापले व आभार मिलिंद घाटूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामभाऊ कुर्झेकर, सचिव देविदास नैताम, सहसचिव तुळशीराम चिलबुले, विवेक घाटुरकर, दीपक निंबेकार, आकाश चिलबुले, विलास चिलबुले, पंकज मोंगरकार, प्रतिभा जुआरे, आदी सदस्यांनी सहकार्य केले.
 

Web Title: In the age of technology society needs organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.