निर्जंतुकीकरणाकडे प्रशासनाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:48+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी फवारणी केली जात आहे. परंतु शहरातील आरोग्य कायम राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्त होण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची ही जबाबदारी नव्हती काय? सामाजिक जाणीवेच्या दृष्टीने प्रशासन काहीच करीत नाही, अशी भावना लोकांमध्ये आहे.

Administration lesson towards sterilization | निर्जंतुकीकरणाकडे प्रशासनाची पाठ

निर्जंतुकीकरणाकडे प्रशासनाची पाठ

Next
ठळक मुद्देचामोर्शी न.पं.चे दुर्लक्ष : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : संपूर्ण जगात व्यापलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश, राज्य व जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करीत आहे. जिल्ह्यातील विविध भागात जंतनाशकाची फवारणी केली जात आहे. परंतु चामोर्शी नगर पंचायत प्रशासन निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील संपूर्ण वॉर्डात जंतनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दमट, ओलसर वातावरणात कोरोनाचे विषाणू अधिक काळ टिकून राहतात, असे आरोग्य विभागामार्फत सांगितले जात आहे. त्यानुसार चामोर्शी शहरात कोंदट, दमट व ओलसर वातावरण बारमाही दिसून येते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी फवारणी केली जात आहे. परंतु शहरातील आरोग्य कायम राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्त होण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची ही जबाबदारी नव्हती काय? सामाजिक जाणीवेच्या दृष्टीने प्रशासन काहीच करीत नाही, अशी भावना लोकांमध्ये आहे.
विशेष म्हणजे नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नाल्या व गटारे तुंबलेले
येथील नाल्यांची साफसफाई सहा-सहा महिने होत नाही. घाणीमुळे नाल्या तुंबून राहतात. रस्त्यावरील कचरा कधीच झाडला जात नसल्याने कडेला घाण साचली असते. शहरातील सर्व गल्लीबोळात ओलसर जागेसह दमट वातावरण पाहावयास मिळतो. कोरोना विषाणूने चामोर्शीत प्रवेश केला तर मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊन भयानक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

गडचिरोली, कुरखेडा, अहेरी येथे अग्निशमन वाहन असल्याने तेथे तत्काळ फवारणी झाली. परंतु चामोर्शी नगर पंचायत प्रशासनाकडे अग्निशमन वाहनाची सोय नाही. तरीसुद्धा फवारणी करणारी साधने (शेती उपयोगी पंप) घेऊन कर्मचारी फवारणी करीत आहेत. जिल्हाधिकाºयांचे निर्देश २४ मार्चला प्राप्त झाल्यानंतर सदर काम सुरू करण्यात आले.
- सतीश चौधरी, मुख्याधिकारी, नगर पंचायत, चामोर्शी

Web Title: Administration lesson towards sterilization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.