७८ कोटींचे धान चुकारे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:34+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्र यावर्षीच्या खरीप हंगामात सुरू करण्यात आले आहे. सदर ५४ केंद्रांवरून आतापर्यंत एकूण ६ लाख १९ हजार ८१६ क्विंटल इतक्या धानाची खरेदी करण्यात आली असून याची किंमत १ अब्ज १२ कोटी ४९ लाख ६७ हजार २०१ रुपये इतकी आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दित आविका संस्थांमार्फत ३७ केंद्रांवर धानाची खरेदी सुरू आहे.

78 crore paddy pending payment | ७८ कोटींचे धान चुकारे प्रलंबित

७८ कोटींचे धान चुकारे प्रलंबित

Next
ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : आदिवासी विकास महामंडळाकडून आतापर्यंत ९ लाख २७ हजार क्विंटल धान खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात ९१ केंद्रांवरून आतापर्यंत एकूण ९ लाख २७ हजार ६८६ क्विंटल इतकी धानाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र धान चुकाऱ्याच्या ऑनलाईन प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने शेतकरी पैशाविना आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे जवळपास ७८ कोटींचे धान चुकारे अद्यापही प्रलंबित आहेत.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्र यावर्षीच्या खरीप हंगामात सुरू करण्यात आले आहे. सदर ५४ केंद्रांवरून आतापर्यंत एकूण ६ लाख १९ हजार ८१६ क्विंटल इतक्या धानाची खरेदी करण्यात आली असून याची किंमत १ अब्ज १२ कोटी ४९ लाख ६७ हजार २०१ रुपये इतकी आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दित आविका संस्थांमार्फत ३७ केंद्रांवर धानाची खरेदी सुरू आहे. आतापर्यंत या केंद्रांवरून एकूण ३ लाख ७ हजार ८६९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या धानाची किंमत एकूण १ अब्ज ६८ कोटी ३७ लाख ५० हजार ७६० रुपये इतकी आहे. आता साठवणुकीसाठी गोदाम तसेच जागा शिल्लक नसल्याने काही केंद्रांवरील धानाची खरेदी बंद आहे. मात्र ज्या ठिकाणी ताडपत्री व जागेची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी आविका संस्थेच्या वतीने धानाचा काटा केला जात आहे.
गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत आतापर्यंत ४ लाख १९ हजार ६०८ क्विंटल इतक्या धानाच्या चुकाऱ्याची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. चुकाऱ्यांपोटी ७६ कोटी १५ लाख ८९ हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळते करण्यात आले आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ७८ हजार २९६ क्विंटल धानाचे १४ कोटी २१ लाख ७ हजार रुपये चुकाऱ्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे. अद्यापही २ लाख २९ हजार ५७३ क्विंटल धानाचे ४० कोटी रुपयाचे चुकारे प्रलंबित आहेत.

नवीन ताडपत्र्यांचा पुरवठा होणार
यावर्षीच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात आविका संस्थांच्या केंद्रांवर धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली. धान खरेदीचा आकडाही प्रचंड वाढला आहे. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचाही माल आविका संस्थेच्या केंद्रावर विक्रीसाठी जात असल्याने अल्पावधीत केंद्र परिसरातील गोदाम धानाने फुल्ल भरले आहेत. तसेच परिसरातील मोकळी जागाही शिल्लक नाही. मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून धान ठेवण्यात आले आहे. तांदूळ व धान उचलबाबतची समस्या निर्माण झाल्याने झाल्याने नवीन ताडपत्र्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने नागपूरवरून काही ताडपत्री खरेदी करण्यात आले आहे. आणखी महामंडळाच्या मुंबई कार्यालयामार्फत सर्व उपप्रादेशिक कार्यालयांना धान साठवणुकीसाठी नवीन ताडपत्रींचा पुरवठा करण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: 78 crore paddy pending payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी