५४४ दिव्यांगांना मिळणार साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:36+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे स्थानिक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग शोध मोहीम, तपासणी व मोजमाप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १ हजार ५१ दिव्यांगांची तपासणी करून ५४४ दिव्यांगांची साहित्यासाठी निवड करण्यात आली.

544 handicapped materials | ५४४ दिव्यांगांना मिळणार साहित्य

५४४ दिव्यांगांना मिळणार साहित्य

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाचा पुढाकार : देसाईगंजच्या शिबिरात १ हजार ५१ दिव्यांगांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे स्थानिक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या परिसरात दिव्यांग शोध मोहीम, तपासणी व मोजमाप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण १ हजार ५१ दिव्यांगांची तपासणी करून ५४४ दिव्यांगांची साहित्यासाठी निवड करण्यात आली.
उद्घाटन तहसीलदार सोनवणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी न. प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, गटविकास अधिकारी सोयाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक कुंभरे, मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके, गटशिक्षणाधिकारी डॉ. पीतांबर कोडापे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश राऊत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अनुपम महेशगौरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गहाणे, डॉ. पी. जी. सडमेक, डॉ. स्नेहल बांधरे उपस्थित होते.
आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कार्यकर्त्यांमार्फत शहरी व ग्रामीण भागातून १२०० दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली होती. या आधारावर रविवारी तालुकास्तरीय शिबिर घेण्यात आले. दिव्यांगांची तपासणी व मोजमाप झाले. ५४४ जणांना अलिम्को संस्थेमार्फत कृत्रिम हात-पाय, अंध दिव्यांगांना छडी, मोबाईल, कर्णबधिरांना यंत्र, तीनचाकी सायकल यासह इतर साहित्याचे वितरण केले जाणार आहे.
दिव्यांगांना शिबिरस्थळी ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच शिबिरस्थळी दिव्यांगांची गर्दी झाली. दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी ६ नोंदणी कक्ष उभारण्यात आले. शिबिराकरिता आवश्यक कागदपत्रे मिळावी यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी व नगरपरिषदेच्या वतीने स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर दिव्यांगांना रहिवासी दाखले, उत्पन्न दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली. मोफत झेरॉक्स, पासपोर्ट, आधारकार्ड काढण्याचीही सुविधा होती. तालुक्यातील ग्रामसेवकांनी दिव्यांगांना शिबिरस्थळी आणणे व गावाला पोहोचवून देण्याची व्यवस्था केली. तसेच आरोग्य विभागाने रूग्णवाहिका उपलब्ध केली.
संचालन पॅरामेडिकल वर्कर दिनकर संदोकर, प्रास्ताविक आरोग्य सहाय्यक उमाकांत दरडमारे व चंद्रकांत चहारे तर आभार तालुका लेखापाल चंद्रकांत मेश्राम यांनी मानले.
 

Web Title: 544 handicapped materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.