२८ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:00+5:30

मागील १५ वर्षांपासून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे यांच्या नेतृत्त्वात व पुढाकाराने किन्हाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने व रक्ताची आवश्यकता असल्याने हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात किन्हाळा, चिखली(तु.) व अरततोंडी येथील दात्यांनी रक्तदान केले.

28 People donated blood | २८ जणांनी केले रक्तदान

२८ जणांनी केले रक्तदान

Next
ठळक मुद्देकिन्हाळा येथे शिबिर : हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला (किन्हाळा) : सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. यथाशिघ्र परीस्थिती निवळावी म्हणून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध स्तरातून मदतीचा ओघ देखील सुरू आहे. यात आमचाही खारीचा वाटा असावा म्हणून देसाईगंज तालुक्यातील हनुमान क्रीडा प्रसारक मंडळ मोहटोलाच्या वतीने किन्हाळा ग्रामपंचायत कार्यालयात ८ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात २८ युवकांनी रक्तदान केले.
मागील १५ वर्षांपासून जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे यांच्या नेतृत्त्वात व पुढाकाराने किन्हाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने व रक्ताची आवश्यकता असल्याने हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात किन्हाळा, चिखली(तु.) व अरततोंडी येथील दात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. अंजली साखरे, सतीश तडकलावार, तंत्रज्ञ विभुतचंद्र रामटेके, सहाय्यक मुर्लीधर पेद्दीवार, प्रमोद देशमुख व संदीप चलाख यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच कैलास पारधी, अरविंद घुटके, हिरालाल शेंडे, वसंता दोनाडकर, दिवाकर बारसागडे, ग्रामसेवक ए. पी. राठोड, प्रेम पारधी, रामदास बुल्ले, घनश्याम उरकुडे, गणेश चिंचुलकर, तेजराम ठेंगरे, तुळशीदास बांडे, चंद्रभान शेंडे, कैैलास लोखंडे, अमरदास शेंडे यांनी सहकार्य केले.

तुटवडा भरून काढण्यासाठी हातभार
हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवात रक्तदान शिबिर घेतले जाते. विसर्जनाच्या आदल्या दिवशी शिबिर घेऊन अनेक युवा कार्यकर्ते रक्तदान करतात. परंतु यंदा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा आहे. तसेच कोरोनामुळे आरोग्यविषयक भीती निर्माण झाली आहे. आरोग्य विभाग व सामाजिक संस्थांतर्फे मोजकेच रक्तदान शिबिर घेतले जात आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भरून निघणे कठिण झाले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हनुमान क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने विपरित स्थितीतही रक्तदान शिबिर घेण्यात आले. विशेष म्हणजे शिबिरादरम्यान सामाजिक अंतराचे भान ठेवण्यात आले होते, तशी व्यवस्थाही करण्यात आली होती.

Web Title: 28 People donated blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.