25 lakhs of help to the families of Gadchiroli families, government houses will also be provided, says sudhir mungantiwar | गडचिरोलीतील शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत, सरकार घरेही देणार
गडचिरोलीतील शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत, सरकार घरेही देणार

गडचिरोली - जांभूरखेडा येथे शहीद झालेल्या 15 पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या वास्तव्यास लागणाऱ्या घरासाठीही सरकार मदत करेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. तसेच शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी सरकारचीच राहिल, असेही मुनगुंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी-60 हे पथक खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवान शहीद झाले. या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात खासगी वाहन चालक असलेल्या तोमेश्वर भागवत सिंगनाथ याचाही मृत्यू झाला. सिंगनाथ याला शहिदाचा दर्जा देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सिंगनाथ यांच्या परिवाराला योग्य मदत देऊ, असं आश्वासनं पोलीस महानिरीक्षकांनी दिलं आहे. तर, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये रोखीने म्हणजेच बँकेत त्यांच्या नावे चेकने जमा केला जाणार आहेत. तसेच जवानांना कॅडरनुसार घरंही दिले जाईल आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही जबाबदारी सरकार घेईल, असे मुनगंटीवर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. 

महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद फोफावला आहे. आपल्या पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मात्र, यापूर्वी नक्षलवादी 15 ते 20 च्या गटाने फिरत होते. मात्र, आता हेच नक्षलवादी 100 आणि 200 च्या टप्प्याने या भागात राहतात, फिरतात. यापूर्वी नक्षलवादी मारण्याचा दर 4.48 होता. मात्र, या पाच वर्षात 98 नक्षलवादी मारले असून तो दर साधरणत: 20 वर पोहोचला आहे. गेल्या 39 वर्षात 2018 मध्ये एकही दुर्दैवी घटना पोलीस दलाबाबत घडली नाही. मात्र, यंदा ही दुर्दैवी घटना घडल्याचं दु:ख असल्याचेही मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. दरम्यान,गेल्या सरकारनेही नक्षलवाद संपुष्टात येण्यासाठी उत्तम काम केलं आहे. त्यामुळे, आमचं किंवा त्यांचा सरकार हा मुद्दा येत नाही. आमचं सरकारही नक्षलवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.   


Web Title: 25 lakhs of help to the families of Gadchiroli families, government houses will also be provided, says sudhir mungantiwar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.