आकडेबहाद्दरांनी चाेरली 2 काेटी 29 लाखांची वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 05:00 AM2022-05-20T05:00:00+5:302022-05-20T05:00:11+5:30

दुर्गम भागातील काही नागरिक वीज तारांवर आकडे टाकून वीज चाेरी करीत करतात. वीज चोरीमुळे वीज  हानी  वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो. वीजपुरवठा व मागणीचे गणित बिघडते. विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो. चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिराेली मंडळात एकूण २ हजार १८१  वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी २ कोटी २९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

2 lakh 29 lakhs electricity by Akade Bahadur | आकडेबहाद्दरांनी चाेरली 2 काेटी 29 लाखांची वीज

आकडेबहाद्दरांनी चाेरली 2 काेटी 29 लाखांची वीज

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिराेली मंडळात एकूण २ हजार १८१ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी २ कोटी २९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर दंड ठाेठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम न भरणाऱ्यांविराेधात पाेलिसात तक्रार करण्यात आली आहे. 
दुर्गम भागातील काही नागरिक वीज तारांवर आकडे टाकून वीज चाेरी करीत करतात. वीज चोरीमुळे वीज  हानी  वाढून वीज यंत्रणेवर ताण येतो. वीजपुरवठा व मागणीचे गणित बिघडते. विजेच्या अनधिकृत वापराचा परिणाम वीज उपलब्धतेवर होऊन प्रामाणिक ग्राहकांना नाहक त्रास होतो. 
गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता रवींद्र गाडगे यांच्या मार्गदर्शनात आलापल्ली, गडचिरोली, ब्रह्मपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांच्या उपविभागीय व शाखा अभियंता तसेच सहकाऱ्यांसोबत पार पाडली. 

युनिट्सची चाेरी

चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिराेली मंडळात एकूण २ हजार १८१  वीजचोऱ्या पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी २ कोटी २९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले आहे.   

७३ वीजचाेरांविराेधात पाेलिसात तक्रार
सर्व वीजचोरांविरुद्ध वीजकायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून वीजचोरीची व तडजोड रक्कम वसूल करण्यात आली आहे. वीजचोरीची व तडजोड रक्कम न भरणाऱ्या ७३ वीज चोरांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Web Title: 2 lakh 29 lakhs electricity by Akade Bahadur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज