वाहन उलटून रोवणी करणारे १९ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:01:10+5:30

देसाईगंज तालुक्यात डोंगरमेंढा येथून कुरखेडा तालुक्यात नवरगाव (आंधळी) येथे धान रोवणीच्या कामाकरिता मजूर घेऊन येणारे वाहन उलटल्याने १९ महिला मजूर जखमी झाले. यातील आठ महिलांची प्रकृती गंभीर आहे. सदर अपघात गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील गेवर्धा गावाजवळ घडला.

19 laborers injured in overturning vehicle | वाहन उलटून रोवणी करणारे १९ मजूर जखमी

वाहन उलटून रोवणी करणारे १९ मजूर जखमी

Next
ठळक मुद्देटायर फुटल्याने अपघात : डोंगरमेंढा येथील मजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : देसाईगंज तालुक्यात डोंगरमेंढा येथून कुरखेडा तालुक्यात नवरगाव (आंधळी) येथे धान रोवणीच्या कामाकरिता मजूर घेऊन येणारे वाहन उलटल्याने १९ महिला मजूर जखमी झाले. यातील आठ महिलांची प्रकृती गंभीर आहे. सदर अपघात गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील गेवर्धा गावाजवळ घडला.
डोंगरमेंढा येथून एमएच ३४, एम ५७६० या क्रमांकाच्या टेम्पो वाहनाने १९ महिला मजूर नवरगावकडे येत होते. गेवर्धा गावाजवळ वाहनाचा समोरचा टायर फुटला. त्यामुळे भरधाव वेगातील वाहन रस्त्यावरच उलटले. या अपघातात पूजा धुर्वे (१९), रोहिणी धुर्वे (२८), शालिनी मलगाम (३५), उत्तरा पंधरे (५०), मिनाक्षी कुळमेथे (३९), सत्यजाबाई नेवारे (५५), कमल करपते (५२), संगीता धुर्वे (३०) या आठ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रूग्णालय कोरची येथे हलविण्यात आले आहे. शितल पुराम (२१), जागृती मलगाम (१९), प्रियंका मलगाम (३७), निकीता मलगामे (३७), विमल करपते (४०), अर्चना मलगाम (३३), भारती मलगाम (४२), कल्पना पुराम (३७), वैशाली धुर्वे (३२), प्रतिभा नेवारे (२७), प्रतिभा करपते या ११ जखमींवर कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडताच गेवर्धा येथील युवकांनी घटनास्थळावर धाव घेऊन सर्व जखमींना तत्काळ दुचाकीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

Web Title: 19 laborers injured in overturning vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात