१८४ नागरिकांना चष्मे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:47+5:30

ज्येष्ठ नागरिक नारायण वाकडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सांजमाडिया संस्थेचे अध्यक्ष रूपलाल गोंगले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर १८४ रूग्णांना मोफत चष्मे व औषधी वितरित करण्यात आली. यावेळी सेवाग्राम येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. अजय शुक्ला व डॉ. कार्लेकर यांनी डोळ्यांची निगा कशी राखावी तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

१८४ Allot glasses to citizens | १८४ नागरिकांना चष्मे वाटप

१८४ नागरिकांना चष्मे वाटप

Next
ठळक मुद्देचामोर्शी येथे कार्यक्रम : सांजमाडिया संस्थेचा पुढाकार; मोफत औषधी वितरित

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती सप्ताहाचे औचित्य साधून जि. प. केंद्र शाळा चामोर्शी येथे शनिवारी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात १८४ नेत्र रूग्णांना मोफत चष्मे व औषधीचे वितरण करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक नारायण वाकडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सांजमाडिया संस्थेचे अध्यक्ष रूपलाल गोंगले यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर १८४ रूग्णांना मोफत चष्मे व औषधी वितरित करण्यात आली. यावेळी सेवाग्राम येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. अजय शुक्ला व डॉ. कार्लेकर यांनी डोळ्यांची निगा कशी राखावी तसेच डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे, सांजमाडिया संस्था बिनागुंडा, लॉयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा व लॉयन्स क्लब चंद्रपूर, महावीर इंटरनॅशनल संस्था चंद्रपूर, सोलर ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते १० फेब्रुवारीपर्यंत सेवाग्राम येथे चामोर्शी तालुक्यातील २४१ नेत्र रूग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर या शिबिरातून शस्त्रक्रिया झाल्यानंतर आलेल्या १८४ नेत्र रूग्णांची पुन्हा तपासणी करण्यात आली. यापैकी १८४ रूग्णांना मोफत चष्मे व औषधीचे वितरण करण्यात आले.
चामोर्शी तालुक्यातील नेत्र रूग्णांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने आत्मिक समाधान लाभल्याचे मत सांजमाडिया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रूपलाल गोंगले यांनी चष्मे वितरण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैभव सोनटक्के, विलास मेश्राम, सुरेश दुर्गे, नीता बारसागडे, मुख्याध्यापक विशाल दुधबळे यांनी सहकार्य केले.

Web Title: १८४ Allot glasses to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.