वाहनासह ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:27 PM2019-07-23T22:27:47+5:302019-07-23T22:28:08+5:30

गोंदिया जिल्ह्यातून कोरेगाव मार्गे देसाईगंजकडे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून देसाईगंज पोलिसांनी ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल सोमवारी सायंकाळच्या सुमारास जप्त केला.

1.5 lakh cases of confiscation including vehicle seized | वाहनासह ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहनासह ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देगोंदिया जिल्ह्यातून दारूची वाहतूक : शंकरपूर-चोप मार्गावर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गोंदिया जिल्ह्यातून कोरेगाव मार्गे देसाईगंजकडे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून देसाईगंज पोलिसांनी ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल सोमवारी सायंकाळच्या सुमारास जप्त केला.
गोंदिया जिल्ह्यातून कोरेगाव मार्गे देसाईगंजकडे पांढऱ्या रंगाच्या एमएच ३४ एए ०७२९ क्रमांकाच्या कारने दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरिक्षक हर्षल नगरकर, सहायक फौजदार अशोक कऱ्हाडे, पोलीस हवालदार वासुदेव अलोणे, चालक पोलीस शिपाई शंकर बडे यांनी शंकरपूर-चोप मार्गावर सापळा रचला. दरम्यान पांढºया रंगाची एमएच ३४ एए ०७२९ क्रमांकाचे वाहन देसाईगंजकडे येताना दिसले. या वाहनास थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला. वाहन चालकाने हे वाहन थांबविले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झळती घेतली. या वाहनातून देशी दारूच्या ९० मिली मापाच्या १ हजार ५०० बॉटला जप्त केल्या. या दारूची किंमत ९० हजार रुपये आहे. वाहनाची किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. दारू व वाहन मिळून ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील बड्या दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
दोघांवर गुन्हा दाखल
सदर दारू जप्त प्रकरणी शुभम दिवाकर सातपुते (२०) रा. गोकुलनगर, प्रविण विलास अडपल्लीवार (३३) रा. चामोर्शी यांच्या विरोधात देसाईगंज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात झाली.

Web Title: 1.5 lakh cases of confiscation including vehicle seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.