बाबो... सामना सुरू असताना 'ती' तोकड्या कपड्यात मैदानावर आली अन्...Video

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 03:05 PM2019-06-02T15:05:51+5:302019-06-02T15:06:28+5:30

Champions League Final 2019: सामना सुरू असताना चाहत्याने आपल्या लाडक्या खेळाडूला भेटण्यासाठी कडेकोट सुरक्षा भेदल्याचे अनेक दाखले देता येतील.

Scantily-Dressed Woman Invades Pitch During Liverpool vs Tottenham Champions League Final 2019 | बाबो... सामना सुरू असताना 'ती' तोकड्या कपड्यात मैदानावर आली अन्...Video

बाबो... सामना सुरू असताना 'ती' तोकड्या कपड्यात मैदानावर आली अन्...Video

Next

माद्रिद, चॅम्पियन्स लीग Final : सामना सुरू असताना चाहत्याने आपल्या लाडक्या खेळाडूला भेटण्यासाठी कडेकोट सुरक्षा भेदल्याचे अनेक दाखले देता येतील. पण एखाद्या महिलेने अशी सुरक्षा भेदल्याचे सहसा एकीवात आलेले नाही आणि तेही अत्यंत तोकड्या कपड्यात तर नाहीच नाही. पण, शनिवारी असा प्रकार पाहण्यात आला आणि अल्पावधीतच ती महिला जगभरात फेमस झाली.




युरोपियन चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना शनिवारी मध्यरात्री खेळवण्यात आला. टोदनहॅम आणि लिव्हरपूल या इंग्लिश प्रीमिअर लीगमधील दोन संघांत जेतेपदाचा सामना सुरू होता.या सामन्यात हा प्रकार घडला. प्रत्यक्ष सामना सुरू असताना एका महिलेने मैदानावर धाव घेतली. सुरक्षा रक्षकांनाही ती महिला कधी आली हे कळले नाही. काळ्या रंगाचा वन पीस तोकडा ड्रेस घातलेल्या या महिलेने सामन्यात बराच वेळ व्यत्यय आणला. मग काय चांगलीच पळापळ झाली. या महिलेची समजूत काढून कसंबसं तिला मैदानाबाहेर  काढण्यात सुरक्षकांना यश आले.




दरम्यान लिव्हरपूलने 2-0 अशा फरकाने चॅम्पियन्स लीगचा चषक नावावर केला. मोहम्मद सलाह आणि डी ओरिजी यांनी प्रत्येकी एक गोल केला.


पाहा व्हिडीओ

Web Title: Scantily-Dressed Woman Invades Pitch During Liverpool vs Tottenham Champions League Final 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.