शाळकरी मुलांचं पोट भरण्यासाठी स्टार खेळाडूनं जमा केले 191 कोटी; आता थेट सरकारला लिहिलं पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 01:11 PM2020-06-16T13:11:25+5:302020-06-16T13:12:00+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं. पण, या लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

Man Utd star MARCUS RASHFORD calls on Government to end child poverty in emotional letter after raising £20MILLION for charity | शाळकरी मुलांचं पोट भरण्यासाठी स्टार खेळाडूनं जमा केले 191 कोटी; आता थेट सरकारला लिहिलं पत्र!

शाळकरी मुलांचं पोट भरण्यासाठी स्टार खेळाडूनं जमा केले 191 कोटी; आता थेट सरकारला लिहिलं पत्र!

Next

कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं. पण, या लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यांचा सरकारने विचार करावा, अशी मागणी होत आहे. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यानं पोषण आहारावर पोट असलेल्या अनेक मुलांवर उपासमारीची वेळ आली. त्यांच्यासाठी इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू मार्कस रशफोर्डनं जवळपास 20 मिलियन पाऊंडचा म्हणजेच 191 कोटींचा निधी जमा केला. आता त्यानं देशातील सर्व खासदारांना पत्र पाठवून देशातील मुलांचं दारिद्र्य संपवण्याची मागणी केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीती पसरली आहे. दक्षता म्हणून अनेक देशांनी शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. जे विद्यार्थी शाळेच्याच पोषण आहारावर अवलंबून आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी  मार्कस रॅशफोर्ड पुढे आला आहे. 


मँचेस्टर युनायटेड क्लबच्या या स्टार खेळाडूनं FareShare या स्वयंसेवी संस्थेसोबत शाळकरी मुलांना अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी 191 कोटींचा निधी जमवला आणि आठवड्याला ही संस्था तीन दशलक्ष मुलांना जेवण पुरवण्याचं काम करतेय. रशफोर्डनं लिहिलं की,''हे 2020 वर्ष आहे आणि ही समस्या तातडीनं सोडवण्यात आली आहे.  या जीवांची काळजी घ्या. त्यांना प्राधान्य द्या.''  

Well Done; CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करन यांना इरफान पठाणची आर्थिक मदत!

मोठी अपडेट; IPL 2020चा मार्ग मोकळा, BCCI साठी गुड न्यूज?

कोरोनामुक्त झालेल्या देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, परदेशातून आलेले प्रवासी 'पॉझिटिव्ह'

Web Title: Man Utd star MARCUS RASHFORD calls on Government to end child poverty in emotional letter after raising £20MILLION for charity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.