Lionel Messi Photo : लिओनेल मेस्सीच्या एका फोटोने मोडले सर्व रिकॉर्ड; ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकले मागे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 04:58 PM2021-07-19T16:58:26+5:302021-07-19T16:58:59+5:30

Lionel Messi's Picture with the Copa America Trophy is now the most liked post of all time from an athlete on Instagram : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातली मैदानावरील स्पर्धा बाहेरही सुरू आहे.

Lionel Messi's Picture with the Copa America Trophy is now the most liked post of all time from an athlete on instagram | Lionel Messi Photo : लिओनेल मेस्सीच्या एका फोटोने मोडले सर्व रिकॉर्ड; ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकले मागे!

Lionel Messi Photo : लिओनेल मेस्सीच्या एका फोटोने मोडले सर्व रिकॉर्ड; ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकले मागे!

Next

लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातली मैदानावरील स्पर्धा बाहेरही सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाला जेतेपद पटकावण्यात यश आलं अन् मेस्सीचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले. दुसरीकडे मात्र युरो स्पर्धेत रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला जेतेपद कायम राखण्यात अपयश आलं. आता मेस्सीनं इंस्टाग्रामवर रोनाल्डोला मागे टाकले. मेस्सीनं कोपा अमेरिका चषकासह इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोला सर्वाधिक २० मिलियन ( २ कोटी ८ लाख) लाईक्स मिळाले आहेत आणि एखाद्या खेळाडूला मिळालेले हे सर्वाधिक लाईक्स आहेत. ( Lionel Messi's Picture with the Copa America Trophy is now the most liked post of all time from an athlete on instagram)

३४ वर्षीय मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात ब्राझिलचा पराभव केला. राष्ट्रीय संघासोबत मेस्सीचे हे पहिलेच मोठे जेतेपद ठरले. त्यामुळे  मेस्सीनं चषकासह फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला अन् नवा रिकॉर्ड नोंदवला गेला.


याआधी रोनाल्डोनं अर्जेंटिनाचे दिग्गज दिएगो मॅराडोना यांच्यासह पोस्ट केलेल्या फोटोला १९.८ मिलियन ( १ कोटी ९८ लाख) लाईक्स मिळाले होते.  

Web Title: Lionel Messi's Picture with the Copa America Trophy is now the most liked post of all time from an athlete on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.