ISL: सचिन तेंडुलकरने केरळ ब्लास्टर्स सोबतची भागीदारी संपुष्टात आणली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 09:08 AM2018-09-17T09:08:10+5:302018-09-17T09:14:05+5:30

ISL: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने इंडियन सुपर लीगमधील ( ISL ) क्लब केरळ ब्लास्टर्ससोबतची भागीदारी चार वर्षानंतर संपुष्टात आणली.

ISL: Sachin Tendulkar ended the partnership with Kerala Blasters | ISL: सचिन तेंडुलकरने केरळ ब्लास्टर्स सोबतची भागीदारी संपुष्टात आणली

ISL: सचिन तेंडुलकरने केरळ ब्लास्टर्स सोबतची भागीदारी संपुष्टात आणली

Next

मुंबई, इंडियन सुपर लीग: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने इंडियन सुपर लीगमधील ( ISL ) क्लब केरळ ब्लास्टर्ससोबतची भागीदारी चार वर्षानंतर संपुष्टात आणली. क्लबला कायम पाठिंबा राहणार असल्याचे सांगून त्याने खेळाडूंना पुढील आव्हानांसाठी सज्ज राहण्याचा सल्ला दिला. 



"पुढील पाच किंवा त्याहून अधिक वर्षांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन क्लबने रचलेल्या भक्कम पायावर मजबूत इमले रचण्याची गरज आहे. संघ सहकारी आणि व्यवस्थापनाशी चर्चा करून मी सहमालकाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा  निर्णय घेत आहे," असे मत तेंडुलकरने व्यक्त केले. 


ISL च्या सलामीच्या सत्रापासून (२०१४) तेंडुलकर या क्लबचा सहमालक आहे. या क्लबला एकदाही जेतेपद पटकावता आले नाही, परंतु २०१४ आणि २०१६ मध्ये त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली होती.

 

Web Title: ISL: Sachin Tendulkar ended the partnership with Kerala Blasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.