कौतुक तर करावंच लागेल; भारतीय संघाने अंध फुटबॉलपटूंना केली आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 10:39 AM2019-01-09T10:39:38+5:302019-01-09T10:41:05+5:30

आशियाई चषक स्पर्धेत 55  वर्षांनी विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचे कौतुक करावं तितकं कमी...

Indian Football team donate 50000 to blind footballers | कौतुक तर करावंच लागेल; भारतीय संघाने अंध फुटबॉलपटूंना केली आर्थिक मदत

कौतुक तर करावंच लागेल; भारतीय संघाने अंध फुटबॉलपटूंना केली आर्थिक मदत

googlenewsNext
ठळक मुद्देभारताने 55 वर्षांनी आशियाई स्पर्धेत विजय मिळवलासलामीच्या लढतीत भारताचा 4-1ने थायलंडवर विजयगुरुवारी होणाऱ्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीशी मुकाबला

अबुधाबी : आशियाई चषक स्पर्धेत 55  वर्षांनी विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाचे कौतुक करावं तितकं कमी... मैदानावरच नव्हे तर बाहेरही या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सरावाला उशीरा येणं, जेवताना मोबाईल वापरणं, अशा अनेक चुकांसाठी प्रशिक्षक स्टीफन कॉनस्टंस्टाईन यांनी खेळाडूंना दंड लावला होता. त्या दंडातून जमा झालेली रक्कम खेळाडूंनी अंध फुटबॉलपटूना देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम फार नसली तरी सामाजिक भान जपणाऱ्या या खेळाडूंचे क्रीडा वर्तुळात कौतुक होत आहे. 



ब्यू टायगर्सने दिलेल्या 50000 हजारातून अंध फुटबॉलपटूंसाठी बॉल खरेदी करण्यात येणार आहेत. प्रशिक्षक कॉनस्टंस्टाईन म्हणाले," समाजाचे आपण देणं लागतो, याचे भान राखणे गरजेचे आहे. अंध फुटबॉलपटूंसाठी तयार करण्यात येणाऱ्या एका बॉलची किंमत 50 डॉलर आहे. त्यामुळे आमच्या मदतीतून ते काही बॉल विकत घेऊ शकतील. संघातील प्रत्येक खेळाडूकडून आम्ही काही रक्कम जमा केली. त्याशिवाय दंड म्हणून आम्ही काही रक्कम जमा केली होती, तीही यात जोडण्यात आली. ही फार मोठी रक्कम नाही, परंतु त्यामागच्या आमच्या भावनांना सीमा नाही.'' 


भारतीय संघाने आशियाई स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात थायलंडला 4-1 असे नमवले. भारतीय संघाच्या विजयात छेत्रीने दोन गोल केले होते, तर अनिरुद्ध थापा आणि जेजे लाल्पेखलूआ यांनी प्रत्येकी एक गोल केला होता. उदांता सिंगनेही गोल करण्यात मोलाचे सहकार्य केले. अ गटातील दुसऱ्या सामन्यात भारतासमोर गुरुवारी संयुक्त अरब अमिराती यांच्याशी भिडावे लागणार आहे. 

Web Title: Indian Football team donate 50000 to blind footballers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.