फुटबॉल : शतकी मतांसह चर्चिल ‘जीएफए’चे बॉस!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 06:52 PM2018-10-28T18:52:25+5:302018-10-28T18:53:06+5:30

दक्षिण गोव्यातून अ‍ॅन्थनी पांगो तर उत्तर गोव्यातून लाविना रिबेलो हे सर्वाधिक मतांसह उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. 

Football: Churchill 'GFA's boss with hundreds of votes! | फुटबॉल : शतकी मतांसह चर्चिल ‘जीएफए’चे बॉस!

फुटबॉल : शतकी मतांसह चर्चिल ‘जीएफए’चे बॉस!

Next
ठळक मुद्देचर्चिल आलेमाव आता २०१८-२०२२ पर्यंत ‘जीएफए’चे बॉस असतील.

निवडणुक शांततेत : माजी मंत्री आवेर्तान फुर्तादोचा पराभव, पॅनेलवर चर्चिलचे वर्चस्व
सचिन कोरडे : जबदस्त उत्सुकता आणि प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोवा फुुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी बाजी मारली ती माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी. त्यांनी माजी मंंत्री आवेर्तान फुर्तादो यांचा १००-५८ अशा मत फरकांनी पराभव केला. चर्चिल आलेमाव आता २०१८-२०२२ पर्यंत ‘जीएफए’चे बॉस असतील. दक्षिण गोव्यातून अ‍ॅन्थनी पांगो तर उत्तर गोव्यातून लाविना रिबेलो हे सर्वाधिक मतांसह उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. 
यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्षपदासाठी आवेर्तान आणि चर्चिल हे दोन्ही लोकप्रिय नेते होते. त्यामुळे आपल्या राजकीय बळाचा वापर करत त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कसर सोडली नव्हती. एकमेकांवर आरोपांच्या फैरीही झाडल्या गेल्या. मात्र अनुभवी चर्चिल आलेमाव यांनी १०० मते मिळवत आपले फुटबॉलवरही वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. 
‘मला क्लबचा पाठींबा होता. क्लबच्या सांगण्यावरुनच मी निवडणुकीच्या मैदानात उतरले होतो. गेल्या अनेक वर्षांत गोव्यातील फुटबॉलचा विकास झाला नाही. क्लबची नाराजी होती. त्यांच्याासाठी काहीतरी करता येईल, या उद्देशाने मी निवडणुक लढवण्याचे ठरवले. प्रतिस्पर्धी आवेर्तान यांनी माझ्यावर काही आरोपही केले. नावेली मतदार संघातून तो विधानसभेत निवडून आला. ईव्हीएम मशिनची ही कमाल आहे. मी हे वांरवार म्हटले आहे. जीएफएच्या निवडणुकीत मात्र बॅलेट पेपरचा वापर होता. बॅलेट पेपरवर मी नक्की जिंकून येईल, याचा मला विश्वास होता. १०० क्लबने मला पाठींबा दिला. त्यांचा मी आभारी आहे.

Web Title: Football: Churchill 'GFA's boss with hundreds of votes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.