ठरलं... Corona Virus मुळे दोन आठवडे लीग बंद दरवाजात होणार; प्रेक्षकांना No Entry!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:00 AM2020-03-11T11:00:40+5:302020-03-11T11:01:24+5:30

Corona Virus ने जगभरात थैमान माजवले आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) खेळवायची की नाही, यावर चर्चा सुरू आहे.

Corona Virus : Spain’s La Liga football behind closed doors for 2 weeks due to virus svg | ठरलं... Corona Virus मुळे दोन आठवडे लीग बंद दरवाजात होणार; प्रेक्षकांना No Entry!

ठरलं... Corona Virus मुळे दोन आठवडे लीग बंद दरवाजात होणार; प्रेक्षकांना No Entry!

Next

Corona Virus ने जगभरात थैमान माजवले आहे. कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरने बाधित असलेल्या संशयितांची संख्या जबळपास ६० पर्यंत गेली आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) खेळवायची की नाही, यावर चर्चा सुरू आहे. पण, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही फ्रँचायझी मालकांनी आयपीएलचे सामने बंद दरवाज्या खेळवण्याचे म्हणजे प्रक्षकांविना खेळावण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. आयपीएलच्या तिकीट विक्रीतून तसेही फ्रँचाझींनी ८-९ कोटींचाच महसूल मिळतो, अन्य महसूलाच्या तुलनेत तो काहीच नाही. त्यामुळे हा तोटा सहन करण्याची तयारी फ्रँचायझींनी दाखवल्याचे वृत्त आहे. याच धर्तीवर कोरोना व्हायरपासून वाचण्यासाठी दोन आठवडे लीग बंद दरवाज्यात खेळवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे.

Corona Virus मुळे Asia XI vs World XI सामने रद्द? बीसीसीआयचे संकेत

पण, हा निर्णय आयपीएलसाठी नसून स्पेनमध्ये होणाऱ्या ला लिगा या फुटबॉल लीगसाठी आहे. ला लिगाचे प्रथम आणि दुसऱ्या विभागीय लढती बंद स्टेडियमवर खेळवण्याच्या वृत्ताला ला लिगानेही दुजोरा दिला आहे. स्पॅनिश क्रीडा उच्चायुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय स्पेनमध्ये होणारे सर्व आंतरराष्ट्रीय स्तराचे सामनेही प्रेक्षकांविना खेळवण्यात यावे, असा फतवा त्यांनी काढला आहे. ''क्रीडा उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन आठवडे ला लिगा सँटेडर आणि ला लिगा स्मार्ट बँक सामने बंद स्टेडियवर खेळवण्यात येणार आहेत,'' असे निवेदन ला लिगाने जाहीर केले. ला लिगावर क्रीडा मंत्रालयाची नजर आहे.  

रेआला माद्रिद आणि एैबर यांच्यात शुक्रवारी होणारा सामना बंद स्टेडियमवर खेळवण्यात येणारा पहिला सामना असेल. स्पेनमध्ये कोरोना व्हायरसचे १५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ला लिगाच्या या घोषणेमुळे युरोपियन स्पर्धेतील सामन्यांवरही परिणाम होऊ शकतो. बार्सिलोना आणइ नेपोली यांच्यातील चॅम्पियन्स लीगचा १८ मार्चला होणारा सामना बंद स्टेडियमवरच खेळवण्यात येणार आहे.

Web Title: Corona Virus : Spain’s La Liga football behind closed doors for 2 weeks due to virus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.