तुम्हीही सकाळचा नाश्ता स्किप करता का? मग लगेच तुमची सवय बदला. कारण नाश्ता न केल्यानेही तुमचं वजन वाढू शकतं. कारण नाश्ता न केल्यामुळे दिवसभरात नेहमीपेक्षा जास्त भूक लागते. परिणामी तुम्ही ओवर इटिंगचे शिकार होता. त्यानंतर ऑफिसमध्ये फक्त एकाच जागी बसून काम करू लागता. त्यामुळे शरीराची अजिबात हालचाल होत नाही आणि वजन वाढतं. 

एक गोष्ट लक्षात ठेवा की, नाश्ता न केल्याने वजन वाढतं आणि त्याचबरोबर अनेक आजार बळावण्याचा धोकाही वाढतो. नाश्ता दिवसभर आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठेवतो. रात्रीच्या जेवणानंतर दुसऱ्या दिवशी शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी हलक्या आणि पौष्टिक नाश्त्याची गरज असते. नाश्तायमध्ये अशा पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. जे शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यासाठी मदत करतील. तसेच जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नाश्ता करणं आवश्यक असतं. तसेत नाश्तामध्ये कमी कॅलरी असणाऱ्या आणि पोषक तत्व अधिक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. जाणून घेऊया काही असे उपाय ज्यामुळे पोषण मिळण्यासोबतच तुमचं वजन कमी करण्यासाठीही मदत होते. 

पनीर आणि केळी 

पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असंत. पनीरसोबत केळ्याचं सेवन इतर अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची पूर्तात करत असतं. नाश्त्याचं हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. 

स्ट्रॉबेरी आणि दही 

सकाळी शरीर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी एक वाटी कमी फॅट असलेलं दही आणि एक वाटी स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय आहे. स्ट्रॉबेरी आणि दही एकत्र खाल्याने शरीराला आवश्यक तेवढी पोषक तत्व मिळण्यासाठी मदत होते. तसेच वजनही नियंत्रणात राहतं. 

चीज आणि सफरचंद 

चीज आणि सफरचंदाचे स्लाइस नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अशा व्यक्ती ज्यांना वजन कमी करायचं असेल तर त्या लोकांसाठी नाश्ता एक उत्तम पर्याय आहे. कारण या नाश्त्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं. तसेच यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. 

उकडलेली अंडी आणि संत्री 

जास्त वेळ उकडलेलं अंड आणि संत्री नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. नाश्त्यामध्ये या पदार्थांचे सेवन केल्याने दिवसभर शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. 

भाजलेले चणे

भाजलेले चणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. भाजलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असतं. तसेच यामध्ये कॅलरीचे प्रमाण फार कमी असते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 


Web Title: Weight loss breakfast to loose weight or healthy breakfast option for weight loss
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.