पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा चविष्य पर्याय, करून पाहा 'ही' वडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 09:07 PM2021-06-20T21:07:36+5:302021-06-20T21:08:27+5:30

पावसाळा आला की सर्दी , पडसं, खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग प्रतिकारक क्षमता बळकट केली तर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो.यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा.

A tasty option to boost the immune system in the rainy season, try 'this' Wadi | पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा चविष्य पर्याय, करून पाहा 'ही' वडी

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा चविष्य पर्याय, करून पाहा 'ही' वडी

googlenewsNext

पावसाळा आला की सर्दी , पडसं, खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग प्रतिकारक क्षमता बळकट केली तर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. या साठी आले पाक वडी हा एक चविष्ट आणि उत्तम उपाय आहे. याच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
साहित्य-
२०० ग्राम आलं, ३०० ग्राम साखर, २ चमचे साजूक तूप, १० वेलचीच्या पाकळ्या, २ चमचे दूध,

कृती-
सर्वप्रथम आलं घ्या आणि त्याला मिक्सरमध्ये दूध घालून वाटून पेस्ट बनवा.
एका पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करा आणि आल्याची पेस्ट घाला आणि ५ मिनिट मध्यम आचेवर हलवा.
या मध्ये साखर आणि वेलची पूड करून घाला.
एका ताटलीत बटर पेपर लावा आणि त्यावर थोडा तुपाचा हात लावा. 
मिश्रण पॅनमध्ये घट्ट झाल्यावर गॅस बंद करून घ्या.
मिश्रण ताटलीत पसरवून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर सुरीने वडी कापून घ्या.
आलेपाक वडी तयार आहे.
ही वडी एका डब्यात भरुन ठेवल्यावर २ महिने ही खराब होणार नाही.

आल्याचे फायदे
आले हे औषधी आहे. यातील  फेनोलिकमुळे अपचन तसेच जलन याला आराम मिळतो. पित्त होण्यापासून रोखले जाते. आले वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. जिंगेरॉलपेक्षा झिंगेरॉन हे कमी वासाचे व गोडसर वासाचे आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते. 
आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे.पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घ्यावा. सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा. सांधेदुखीवर आल्याचा काढा देतात वा एरंडेल तेलाबरोबर सुंठीची चिमूट नियमाने घ्यावी. मधूमेहात मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले तर नियमितपणे आल्याचा रस घ्यावा. 

Web Title: A tasty option to boost the immune system in the rainy season, try 'this' Wadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.