नारळाच्या दुधातली चवदार भेंडी, एकदा खाल्ल्यानंतर खातच राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 05:00 PM2021-06-14T17:00:31+5:302021-06-14T17:01:30+5:30

भेंडीची भाजी बनवण्याचा अनेक पद्धती आहेत. आज आम्ही आपल्याला नारळाच्या ग्रेव्हीची भेंडीची भाजी बनवायची रेसिपी सांगणार आहोत.

Tasty okra in coconut milk, once eaten, keep eating | नारळाच्या दुधातली चवदार भेंडी, एकदा खाल्ल्यानंतर खातच राहाल

नारळाच्या दुधातली चवदार भेंडी, एकदा खाल्ल्यानंतर खातच राहाल

googlenewsNext

भेंडी ही अशी भाजी आहे जी विविध पद्धतीनी बनवली की चवदार लागते. मग ती लहानंपासून मोठ्यांना सर्वांना आवडते. भेंडीची भाजी बनवण्याचा अनेक पद्धती आहेत. आज आम्ही आपल्याला नारळाच्या ग्रेव्हीची भेंडीची भाजी बनवायची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.
साहित्य -
५ कप भेंडीचे लांब केलेले काप, ३ चमचे तेल, १ चमचा आलं बारीक केलेलं, लसणाच्या ३-४ पाकळ्या , ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ कांदा बारीक चिरलेला,१ चमचा तिखट, १ चमचा धणेपूड, १/२ चमचा हळद, कडीपत्ता, मीठ चवीप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे २ कप नारळाचं दूध.
कृती-
सर्वप्रथम कढईत तेल गरम करा.
भेंडी मध्यम आचेवर १० मिनिटे परतून घ्या. नंतर काढून घ्या. 
कढईत त्याच तेलात आलं, लसूण, कडीपत्ता,आणि कांदा, लाल,तिखट, हळद, धणेपूड, कापलेली भेंडी आणि मीठ घालून परतून घ्या. या मध्ये नारळाचं दूध मिसळा आणि २ मिनिटे
शिजवा. गर्मागरम नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी सर्व्ह करा.

भेंडीचे फायदे
भेंडीमध्ये विटामिन ए जीवनसत्व असते. ते आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवते.
भेंडीमध्ये युगेनॉल असते. हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे डायबिटीज होण्याचा धोका कमी होतो.
मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी भेंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषता लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी भेंडी अत्यंत उपयुक्त आहे. जर मेंदूचे कार्य सुरळीच राहायचे असेल तर तुम्ही भेंडी आवश्य खा.
भेंडी खाल्ल्यामुळे आतड्यामधील विषारी तत्व बाहेर पडतात. त्यामुळे तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
भेंडीमध्ये विटामिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि आजारांपासून सुटका होते
 

Web Title: Tasty okra in coconut milk, once eaten, keep eating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.