१० मिनिटात तयार करा बटाट्याचे धिरडे आणि घरच्यांना करा खुश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 05:46 PM2019-07-01T17:46:55+5:302019-07-01T17:48:30+5:30

तुम्हाला जर बटाट्याचे पदार्थ आवडत असतील तर हे धिरडे नक्की करून बघा. दहा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल यात शंका नाही. 

recipe of potato Dhiarade or dosa or chilla which can made in just 10 minutes | १० मिनिटात तयार करा बटाट्याचे धिरडे आणि घरच्यांना करा खुश 

१० मिनिटात तयार करा बटाट्याचे धिरडे आणि घरच्यांना करा खुश 

Next

पुणे : तुम्हाला जर बटाट्याचे पदार्थ आवडत असतील तर हे धिरडे नक्की करून बघा. दहा मिनिटात तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल यात शंका नाही. 

साहित्य :

एक वाटी तांदळाचं पीठ, 

दोन मोठे चमचे बारीक रवा, 

एक वाटी पाणी, 

अर्धी वाटी ताक (फार आंबट नको)

एक वाटी किसलेला बटाटा, 

एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट,

 एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा,

 अर्धा चमचा आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, 

मीठ चवीनुसार,

तेल , 

कोथिंबीर 

कृती :

  • मोठ्या पातेल्यात पाणी आणि ताक एकत्र करून त्यात तेल सोडून बाकी पदार्थ टाका.
  • चमच्याने पदार्थ हलवून सरसरीत करा, गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या 
  • हे मिश्रण १व मिनिटे मुरू द्या.
  • आता नॉनस्टिक पॅनवर चमचाभर तेल पसरवून घ्या. 
  • पॅन तापला ही त्यावर मिश्रण पसरवून घ्या. 
  • झाकण ठेवून एक वाफ घ्या. 
  • आता बाजूंनी चमचाभर तेल सोडून धिरडे उलटवून घ्या. 
  • दुसऱ्या बाजूने शेकून सर्व्ह करा बटाट्याचे धिरडे. 

Web Title: recipe of potato Dhiarade or dosa or chilla which can made in just 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.