Mango chhunda recipe make mango chhunda with raw mangoes here its recipe in Marathi | कैऱ्यांपासून बनवा आंबट-गोड 'मँगो छुंदा', 'ही' आहे रेसिपी!
कैऱ्यांपासून बनवा आंबट-गोड 'मँगो छुंदा', 'ही' आहे रेसिपी!

(Image Credit : Yummy Tummy)

वर्षभर सर्वजण आंब्याची वाट पाहत असतात. या दिवसांमध्ये आंब्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचीही घरामध्ये रेलचेल असते. साधारणतः आंबा सर्वांचं आवडतं फळ आहे. तुम्ही आंब्याचा आनंद कोणत्याही पदार्थाच्या स्वरूपात घेऊ शकता. या एका फळापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जाऊ शकतात. त्यांपैकीच एक म्हणजे मँगो छुंदा. जर तुम्ही आंब्यापासून काही नवीन तयार करण्याच्या विचारात असाल तर मँगो छुंदा तयार करू शकता. 

आंब्यापासून तयार होणारी ही रेसिपी टेस्टी असण्यासोबतच हेल्दीही असते. एवढचं नाही तर ही तयार करण्यासाठीही अत्यंत सोपी असते. जाणून घेऊया मँगो छुंदा तयार करण्याची रेसिपी...

मँगो छुंदा तयार करण्याची रेसिपी...

साहित्य : 

  • कैरी
  • साखर 
  • लाल मिरची पावडर 
  • जीरा पावडर 
  • हळद पावडर 
  • काळं मीठ

 

असा तयार करा छुंदा... 

- गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवा.

- त्यानंतर किसलेली कैरी आणि साखर एकत्र करा. 

- हे मिश्रण तोपर्यंत एकत्र करा जोपर्यंत हे घट्ट होत नाही. 

- मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये मसाले एकत्र करून थोडा वेळासाठी पुन्हा एकत्र करून घ्या.

- एका बाउलमध्ये मिश्रण काढून घ्या आणि थंड होऊ द्या. 

- टेस्टी आणि हेल्दी मँगो छुंदा खाण्यासाठी तयार आहे. 


Web Title: Mango chhunda recipe make mango chhunda with raw mangoes here its recipe in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.