घरच्याघरी सहज बनवा हा केरळचा स्ट्रीट स्टाईल थट्टु डोसा, एकदा खाल खातच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 08:33 PM2021-06-11T20:33:42+5:302021-06-11T20:34:38+5:30

बाहेर पाऊस पडू लागलाय. अशा या बरसणाऱ्या पावसात काही वाफाळलेलं खायची इच्छा तर होणारच. नेहमीच्या रेसिपीजना जरा टाटा बायबाय करा आणि आम्ही तुम्हाला देत असलेली ही नवीन रेसिपी ट्राय करा.

Make this Kerala street style thattu dosa easy at home, keep eating it once! | घरच्याघरी सहज बनवा हा केरळचा स्ट्रीट स्टाईल थट्टु डोसा, एकदा खाल खातच रहाल!

घरच्याघरी सहज बनवा हा केरळचा स्ट्रीट स्टाईल थट्टु डोसा, एकदा खाल खातच रहाल!

Next

बाहेर पाऊस पडू लागलाय. अशा या बरसणाऱ्या पावसात काही वाफाळलेलं खायची इच्छा तर होणारच. नेहमीच्या रेसिपीजना जरा टाटा बायबाय करा आणि आम्ही तुम्हाला देत असलेली ही नवीन रेसिपी ट्राय करा. केरळच्या रस्त्यांवर मिळणारा हा थट्टू डोसा तुमच्या पावसाळ्यातली खाबूगिरी तृप्त करेल.

साहित्य:
१ वाटी तांदूळ

अर्धा वाटी उकडे तांदूळ

१ वाटी उडीद डाळ

चिमूटभर मेथीचे दाणे

२ चमचे उकडलेला भात

चवीनुसार मीठ

तळायला तेल


डोसाचे बॅटर कसे बनवाल:

डाळ, मेथीचे दाणे आणि तांदूळ स्वच्छ धुवून अथवा आठ ते दहा तास पाण्यात भिजत ठेवा.

आठ ते दहा तासांनी पाणी उपसून डाळ आणि तांदूळ बारीक वाटून घ्या

चवीनुसार मीठ टाकून एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा

डोसाचं पीठ रात्रभर अशा प्रकारे ठेवल्यास चांगलं फुगून वर येतं


टट्टु डोसा करण्याची कृती:

डोसा तवा गॅसवर गरम करत ठेवा

डोसा बॅटर चांगलं ढवळून घ्या

तवा तापला की त्याला थोडं तेल लावून ते टिश्यू पेपरने पुसून घ्यावं. टिश्यूपेपर ऐवजी कच्चा कांदा अथवा नारळाची किशीचा वापर करू शकता. 

जर तवा नॉनस्टिक असेल तर तेल लावण्याची गरज नाही

तवा तापला आहे का हे पाहण्यासाठी तव्यावर थोडं पाणी शिंपडावं

पाण्याची वाफ झाली की एक डावभर पीठ तव्याच्या मध्यभागी ओताव आणि डावेच्या उलट्या बाजूने ते तव्याभर गोलाकार पसरावं.

बाजूने तेल सोडा आणि झालेला डोसा सर्व्ह करा.

चटणी आणि सांबारसोबत हा डोसा मस्त लागतो.

Web Title: Make this Kerala street style thattu dosa easy at home, keep eating it once!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.