पोषक तत्वांचा खजाना आहे सुकवलेली पपई; लिव्हरसाठी ठरते वरदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:37 PM2019-10-31T12:37:48+5:302019-10-31T12:38:21+5:30

पपई एक असं फळ आहे, ज्यामध्ये फायबर, अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट आणि बिटा-कॅरोटिन मुबलक प्रमाणात असतं. पिकलेल्या पपईसोबतच कच्ची पपई खाणंही अत्यंत फायदेशीर ठरते. पपई एक असं फळ आहे, जे तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता.

Health Benefits of eating dry papaya or papai | पोषक तत्वांचा खजाना आहे सुकवलेली पपई; लिव्हरसाठी ठरते वरदान

पोषक तत्वांचा खजाना आहे सुकवलेली पपई; लिव्हरसाठी ठरते वरदान

googlenewsNext

पपई एक असं फळ आहे, ज्यामध्ये फायबर, अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट आणि बिटा-कॅरोटिन मुबलक प्रमाणात असतं. पिकलेल्या पपईसोबतच कच्ची पपई खाणंही अत्यंत फायदेशीर ठरते. पपई एक असं फळ आहे, जे तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता. पण तुम्हाला माहीत आहे का? पपई सुकवूनही खाणं शक्य होतं. सुकलेली पपई खाल्याने तुमची भूक वाढते आणि शरीर अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त आज आपण जाणून घेऊया सुकवलेली पपई खाण्याचे इतर फायदे... 

कॅरोटिनॉइड असतं मुबलक प्रमाणात... 

पपईमध्ये भरपूर प्रमाणात कॅरोटीनाइड असतं. जे आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असतं. सुकवलेल्या पपईमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी असतं. ज्यामुळे डोळ्यांसाठी याचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. डोळ्यांसोबतच सुकवलेल्या पपईच्या सेवनाने कॅन्सरसारख्या आजारंपासून बचाव करण्यासाठी मदत होते. 

लिव्हरसाठी फायदेशीर...

अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, सुकवलेली पपई लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी मदत करते. सुकवलेली पपई शरीरातील टॉक्सिन्स रिमूव्ह करते. तसचे लिव्हरमध्ये तयार होणारे सेल्स बॅलेन्स करतं. ज्यामुळे लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव होतो. 

लिव्हरची सूज 

सध्या अनेक लोक लिव्हरमध्ये सूज आल्याच्या समस्येने ग्रस्त असतात. ज्यामुळे कॅन्सर, डायबिटीसची समस्या दिवसागणिक वाढत आहे. अशातच भरपूर न्यूट्रिशन्सचा खजाना असलेली सुकवलेली पपई खाल्याने लिव्हरला येणाऱ्या सूजेपासून सुटका करणं शक्य होतं. 

व्हायरल ताप 

जर तुम्ही दररोज सुकवलेल्या पपईचं सेवन करत असाल तर तुम्हाला व्हायरल ताप येण्याची शक्यता असते. सुकवलेली पपई अॅन्टी-व्हायरल एजंट्सप्रमाणे काम करते. त्याचबरोबर हे इतर आजारांपासून बचाव करण्यासाठीही मदत करते. 

सांधेदुखीवर फायदेशीर

सुकवलेली पपई खाल्याने हाडे मजबुत होतात आणि हे सांधेदुखीसाठी फायदेशीर ठरतात. पपईमध्ये असलेलं प्रोटीन, फायबर आणि आयर्न कमजोरी दूर करतात. एवढचं नाहीतर पचनक्रिया सुधारण्यासाठीही फायदेशीर ठरते. 

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करतं मदत 

पपईमध्ये फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन-सी आणि अॅन्टी-ऑक्सिडंटही मुबलक प्रमाणात असतात. या गुणधर्मांमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करते. 

लक्षात ठेवा... 

गर्भवती महिलांनी कोणत्याही स्वरूपात पपई खाणं टाळावं. तसेच ज्या लोकांना पोटाच्या समस्या सतावत असतील त्यांनीही पपई खाऊ नये. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Health Benefits of eating dry papaya or papai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.