रव्याच्या इडलीला द्या नवा ट्वीस्ट, पाहा लज्जतदार ज्वारीची इडली...बोेटे चाटत राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 10:07 PM2021-06-15T22:07:46+5:302021-06-15T22:13:22+5:30

रव्या पासून बनलेली इडली म्हणजे खव्वय्यांचा विकपॉईंट. पण तुम्ही रव्याची इडली चाखली असेल आज ट्राय करूया ज्वारीची इडली.

Give a new twist to Ravi's Idli, look at the delicious jowar Idli | रव्याच्या इडलीला द्या नवा ट्वीस्ट, पाहा लज्जतदार ज्वारीची इडली...बोेटे चाटत राहाल

रव्याच्या इडलीला द्या नवा ट्वीस्ट, पाहा लज्जतदार ज्वारीची इडली...बोेटे चाटत राहाल

Next

इडली हा असा दाक्षिणात्य पदार्थ आहे जो पचायला हलका व बनवायला अगदी सोपा. रव्या पासून बनलेली इडली म्हणजे खव्वय्यांचा विकपॉईंट. पण तुम्ही रव्याची इडली चाखली असेल आज ट्राय करूया ज्वारीची इडली.
साहित्य
१ कप ज्वारी, १ कप तांदूळ, १ कप उडीदडाळ, १ कप रवा, एक चिमूट खायचा सोडा, चवीनुसार मीठ,  तेल.

कृती
तांदूळ, उडीदडाळ, ज्वारी पाण्यात वेगवेगळी स्वच्छ धुऊन घ्या. नंतर ७ तास वेगवेगळी पाण्यात भिजवा. नंतर एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात रवा टाका आणि ढवळून घ्या. सकाळी या पीठात मीठ आणि सोडा घाला. त्यानंतर ज्या प्रमाणे तुम्ही रव्याची इडली बनवता अगदी त्याच प्रमाणे इडली पात्रात इडली बनवून घ्या. हिरवी चटणी आणि सांबरबरोबर सर्व्ह करा.

ज्वारीचे फायदे

  • सध्या ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे सेवन गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. 
  • वाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत. या संदर्भातील समस्यांमुळे जेवणात ज्वारीचं सेवन खुप महत्वाचं ठरते.
  • ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.
  • ज्वारीत भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. एनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.
  • सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.
  • ज्वारी शरीरातीलइन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.
  • ज्वारीत असणारी पोषक तत्व किडनीस्टोनला आळा घालतात, त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या व्यक्तीने ज्वारीची भाकरी किंवा इतर स्वरूपातील ज्वारीचे पदार्थांचा आहारात नक्की समावेश करावा.
  • ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते. 

 

Web Title: Give a new twist to Ravi's Idli, look at the delicious jowar Idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.