इम्युनिटी वाढवण्याचा सोपा फंडा, 'हे' खास सरबत प्याल तर आजार राहतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 03:35 PM2021-06-16T15:35:24+5:302021-06-16T15:44:59+5:30

सर्वांना बेलाची पाने आणि त्याचे महत्त्व माहीत असेलच. मात्र बेलाचे फळ आणि त्यापासून केले जाणारे सरबत तुमच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे हे तुम्हाला माहीत आहेत का?

An easy fund to boost immunity, if you drink this special syrup, you will stay away from diseases | इम्युनिटी वाढवण्याचा सोपा फंडा, 'हे' खास सरबत प्याल तर आजार राहतील दूर

इम्युनिटी वाढवण्याचा सोपा फंडा, 'हे' खास सरबत प्याल तर आजार राहतील दूर

Next

सर्वांना बेलाची पाने आणि त्याचे महत्त्व माहीत असेलच. मात्र बेलाचे फळ आणि त्यापासून केले जाणारे सरबत तुमच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे हे तुम्हाला माहीत आहेत का? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी बेलफळाचे सरबत पिण्याचा सल्ला दिला जातो. बेलफळाचे सरबत पिण्याने बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्या कमी होतात. मधुमेहींसाठी तर बेलफळ वरदानच ठरते.

बेलफळाचे सरबत करण्याची सोपी पद्धत -
साहित्य - दोन मध्यम आकाराची बेलफळे, पाणी, जिरे पावडर, चवीपुरते मीठ आणि  चार चमचे साखर अथवा गुण ( मधुमेंहींनी साखरेचा वापर करू नये )
सरबत करण्याची पद्धत -
बेलफळे स्वच्छ धुवून पुसून घ्या. बेलफळे कापून त्यातील गर काढून घ्या. भांड्यामध्ये हा गर काढून घ्या आणि त्या गराच्या दुप्पट पाणी त्यात मिसळा. गर आणि पाणी एकजीव करा. मिश्रण एकजीव झाल्यावर एका गाळणीच्या मदतीने ते गाळून घ्या. गाळताना गाळणीमध्ये पल्ब दाबून त्यातील सर्व रस भांड्यात निथळून घ्या. जर तुम्ही मधुमेही नसाल तर तुम्ही या सरबतामध्ये आवडीनुसार साखर अथवा गुळ मिसळू शकता. सरबत ग्लासात काढून घ्या. वरून चवीपुरते मीठ आणि जिरेपावडर टाकून प्यायला द्या.

बेलफळाचे फायदे

  • बेलफळाच्या सरबतामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. या रसामुळे पचनसंस्थेतील अडथळे दूर होतात ज्यामुळे पोट स्वच्छ होते. सहाजिकच यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, मुळव्याधी, पोटदुखी, गॅस होणे अशा समस्यांपासून तुमची सुटका होते. 
  • बेलफळाच्या सरबतामुळे रक्त शुद्ध होते. कारण यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. ज्यामुळे यकृत आणि किडनीचे कार्य सुधारते. रक्त शुद्ध झाल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, पुरळदेखील कमी होतात.
  • मधुमेहींसाठी बेलफळाचा रस अथवा सरबत घेणे फारच फायद्याचे आहे. कारण यामुळे मधुमेहींच्या इन्शुलीनच्या निर्मितीवर नियंत्रण राहण्यास मदत होते. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अती प्रमाणात वाढत अथवा कमी होत नाही.
  • बेलफळाच्या रसामुळे श्वसनाच्या समस्या कमी होतात. बेलफळाचे सरबत पिण्याने घसा खवखवणे, सर्दी, खोकल्यात आराम मिळतो. 

Web Title: An easy fund to boost immunity, if you drink this special syrup, you will stay away from diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.