बाहेर आलेलं पोट आणि वजन कमी करण्यासाठी रोज करा 'या' ज्यूसचं सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 10:54 AM2019-04-04T10:54:08+5:302019-04-04T10:59:56+5:30

जाडेपणा आणि वजन वाढणं या दोन गोष्टींमुळे जास्तीत जास्त लोक हैराण आहेत. जाडेपणा कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात.

Cucumber juice for weight loss and fat belly know how and when to consume it | बाहेर आलेलं पोट आणि वजन कमी करण्यासाठी रोज करा 'या' ज्यूसचं सेवन!

बाहेर आलेलं पोट आणि वजन कमी करण्यासाठी रोज करा 'या' ज्यूसचं सेवन!

googlenewsNext

(Image Credit : lifealth.com)

जाडेपणा आणि वजन वाढणं या दोन गोष्टींमुळे जास्तीत जास्त लोक हैराण आहेत. जाडेपणा कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. वेगवेगळ्या डाएट फॉलो करतात, एक्सरसाइज करतात इतकेच काय तर डायटिंगही करू लागतात. पण सगळ्यांना याचा फायदा होतोच असं नाही. 

(Image Credit : www.eatthis.co)

वाढतं पोट आणि वजन कमी करणं फार गरजेचं आहे कारण याने वेगवेगळे आजार होतात. याने ना केवळ हृदयासंबंधी आजार स्ट्रोक आणि हाय ब्लड प्रेशरची समस्याही निर्माण होते. तसेच डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉलही शरीरात जमा होतं. मग प्रश्न उभा राहतो की, वजन कमी कसं केलं जावं? तर यासाठी तुम्हाला असे काही पदार्थ खावे लागतील ज्यात कॅलरी आणि फॅट कमी असतील. जसे की, कलिंगड, काकडी इत्यादी फळं खावेत. सध्या उकाड्याचं वातावरण आहे, त्यामुळे ही फळं-भाज्या खाऊन तुम्ही वजन कमी करु शकता. काकडी ज्यूस यात अधिक फायदेशीर ठरतो. चला जाणून घेऊ याचे फायदे....

१) काकडीच्या ज्यूसमध्ये सोडियम नसतं आणि काकडी नैसर्गिक रुपाने डाययुरेटिक असते. यामुळे शरीरातील विषारी तत्व आणि फॅट सेल्स काकडी बाहेर काढते. सोबतच याने ब्लॉटिंग होण्यापासूनही बचाव होतो. जर तुम्हाला भूक लागली तर दोन काकड्या कापून खाव्यात. याने तुमची भूक शांत होईल. काकडीमध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन ए असतात. याने शरीराला पोषण मिळतं. 

२) रोज सकाळी रिकाम्या पोटी काकडीचा ज्यूस प्यावा. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. काकडीचा ज्यूस तयार करण्यासाठी एक काकडी, थोडा लिंबाचा रस, एक चिमुट काळं मीठ, एक चिमुट काळे मिरे, थोडा पुदीना टाकून ज्यूस तयार करा. हा ज्यूस टेस्टीही होईल. रोज सकाळी हा ज्यूस प्यावा. 

३) काकडीचा ज्यूस प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिज्म सुधारतं. मेटाबॉलिज्म योग्य राहिल्याने पचनक्रिया चांगली राहते. हा ज्यूस सहजपणे पचनही होतो. 

४) काकडीच्या ज्यूसमध्ये जराही फॅट नसतं आणि त्यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही हा हेल्दी ज्यूस सेवन करू शकता. चांगल्या परिणामासाठी या ज्यूसचा रोजच्या आहारात समावेश करा.  

५) तज्ज्ञही वजन कमी करण्यासाठी काकडीचा ज्यूस फार फायदेशीर असल्याचे सांगतात. पण हे तुम्ही काकडीचं सेवन कसं करता यावर अवलंबून असतं. 

६) वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट. अमेरिकेच्या अॅग्रीकल्चर डिपार्टमेंटनुसार, पॅक्ड किंवा डबाबंद भाज्यांचं सेवन करण्याऐवजी ताज्या हिरव्या भाज्या खायला हव्यात. यात जर तुम्ही रोज काकडीच्या ज्यूसचा समावेश केला तर याने फायदा अधिक होईल. 

काकडीच्या पाण्याचे फायदे

असं तयार करा काकडीचं पाणी :

एक काकडी घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर अर्ध्या काकडीची साल काढून घ्या आणि अर्धी काकडी तशीच ठेवा. काकडी स्लाइसमध्ये कापून घ्या. काकडीच्या स्लाइस एका स्वच्छ जारमध्ये टाकून त्यामध्ये पाणी भरून ठेवा. पाण्याचे प्रमाण स्लाइस अनुसार ठेवा. थोडा वेळ तसंच ठेवा. तयार पाण्याचे दोन दिवसांपर्यंत सेवन करू शकता. पण दोन दिवसांपेक्षा जास्त वेळी ठेवू नका. 

श्वासांची दुर्गंधी दूर करण्यासाठी 

पोटामध्ये अधिक उष्णता निर्माण झाल्यामुळे श्वासांमधून दुर्गंधी येऊ लागते. काकडीच्या पाण्यामध्ये हायड्रेटिंग प्रॉपर्टीज असतात. याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. हे पाणी पोटातील उष्णता कमी करण्याचं काम करतं. तसेच तोंडामध्ये जमा होणारे हानिकारक जीवाणू नष्ट करण्याचं कामही हे पाणी करतं. 

(टिप - वरील कोणत्याही गोष्टीचा दावा आम्ही करत नाही. कारण प्रत्येकाची शरीर रचना ही वेगळी असते. त्यामुळे आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा त्यानंतर हा ज्यूस सेवन करावा. कारण काही लोकांना याची अॅलर्जीही असू शकते. वरील बाबी आम्ही तुमच्यापर्यंत केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहोत. )

Web Title: Cucumber juice for weight loss and fat belly know how and when to consume it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.