ख्रिसमस साजरा करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांचा उत्साह दिसून येतो. यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे कोणतेही सण साजरे करण्यासाठी जास्त घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे  घरच्याघरी कसा सण साजरा करता येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ख्रिसमस मध्ये खवय्यांची ही मजा असते कारण या दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या कूकीज, वाइन केक, बिस्किट्स हे सगळं काही मिळत.

अशा दिवसात तुम्हाला घरच्या घरी  केक( Home Made Cake) बनवायची इच्छा असेल मात्र समजत नसेल कसा बनवायचा तर आज आम्ही खास व्हिडीओ तुम्हाला दाखवणार आहोत. जे बघून तुम्ही सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी मस्त केक बनवू शकाल. चला तर मग पाहूयात होम मेड केक रेसिपी व्हिडिओ. या प्रकारचा केक तयार करताना तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही कुकरचा वापरसुद्धा करू शकता. फक्त कुकरमध्ये आधी मीठ किंवा वाळू टाकून प्री हिट करावा लागेल.

Web Title: Christmas cake recipes 2020 easy christmas cake recipes watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.