तुम्ही सफरचंदासोबत बॅक्टेरिया खात आहात का?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 01:23 PM2019-07-25T13:23:47+5:302019-07-25T13:24:31+5:30

आपण नेहमी ऐकतो की, 'अ‍ॅन अ‍ॅपल ए डे, किप डॉक्टर्स अव्हे'. तसेच डॉक्टर्सही आहारात सफरचंदाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

An apple carries about 100 million bacteria says study | तुम्ही सफरचंदासोबत बॅक्टेरिया खात आहात का?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च?

तुम्ही सफरचंदासोबत बॅक्टेरिया खात आहात का?; जाणून घ्या काय म्हणतो रिसर्च?

googlenewsNext

आपण नेहमी ऐकतो की, 'अ‍ॅन अ‍ॅपल ए डे, किप डॉक्टर्स अव्हे'. तसेच डॉक्टर्सही आहारात सफरचंदाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. फायबर्स आणि व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत असणारं सफरचंद, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं, याबाबत अजिबातच दुमत नाही. परंतु, एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, एका सफरचंदामध्ये जवळपास 100 मिलियन म्हणजेच, जवळपास 10 कोटी बॅक्टेरिया असतात. म्हणजेच, जेव्हा आपण सफरचंद खातो तेव्हा त्यासोबत आपण 10 कोटी बॅक्टेरियाही खात असतो. 

सफरचंदामध्ये असतात मायक्रोब्स 

सफरचंदावर असलेले मायक्रोब्स आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत की वाईट हे सफरचंद कुठे उगवण्यात आलं आहे, त्यावर अवलंबून असतं. संशोधकांचं असं म्हणणं आहे की, सर्वाधिक मायक्रोब्स हे सफरचंदामध्ये असून ते किती प्रमाणात आहेत, हे तुम्ही सफरचंदाचा जो भाग खाणार त्यावर अवलंबून असते. रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, जर तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने उगवण्यात आलेले सफरचंद खात असाल तर त्यांमद्ये विविध आणि असंतुलित बॅक्टेरिया असतात. जे त्यांना पारंपारिक सफरचंदाच्या तुलनेमध्ये जास्त आरोग्यदायी आणि चविष्ट बनवतात. 

65052567 मायक्रोब्सचा स्त्रोत असतात ही कच्ची फळं आणि भाज्या

ऑस्ट्रियाच्या ग्रॅज यूनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलजीचे प्रोफेसर गेब्रियल बर्ग यांनी सांगितले की, 'आपल्या आहारामध्ये असलेले बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरस आपल्या पोटामध्ये थोड्यावेळासाठी जमा होतात. पदार्थ शिवजताना यांपैकी अधिक बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे कच्ची फळं आणि भाज्या या मायक्रोब्सचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे.' हे संशोधन जर्नल फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले असून यामध्ये नॉर्मल सफरचंद आणि ऑर्गॅनिक सफरचंदांमध्ये तुलना करण्यात आले आहे.

 ऑर्गॅनिक आणि नॉर्मल सफरचंदामध्ये बॅक्टेरियांची संख्या समान

संशोधनामध्ये, सफरचंदाच्या सर्व भागांचं वेगवेगळं विश्लेषण करण्यात आलं आहे. ज्यामध्ये असं आढळून आलं की, ऑर्गैनिक आणि नॉर्मल सफरचंदामध्ये बॅक्टेरियांची संख्या समान असते. बर्ग यांनी सांगितले की, दोन्ही प्रकारची सफरचंदांचं निरक्षण केल्यानंतर असं समजलं की, 240 ग्रॅम सफरचंदामध्ये जवळपास 10 कोटी बॅक्टेरिया होते. सर्वाधिक बॅक्टेरिया सफरचंदाच्या बियांमध्ये आढळून आले. तसेच सफरचंदाच्या सालींमध्येही मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया आढळून आले. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: An apple carries about 100 million bacteria says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.