जर तुमचं हृदय निरोगी राहिलं तर, तुम्ही दीर्घायुषी व्हाल, असं अनेकदा आपण ऐकतो. सध्या अनेक लोकांचा मृत्यू हृदयरोगांमुळे होतो. जगभरामध्ये सर्वात जास्त मृत्यू होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण हे हृदयरोग असल्याचे अनेक संशोधनांमधून स्पष्ट झालं आहे. आकड्यांनुसार, जगभरामध्ये दरवर्षी 20 कोटीपेक्षा जास्त लोकं हृदयरोगाने आपला जीव गमावतात. त्यामुळे हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी योग आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, जर तुम्ही दररोज एक वाटी ओट्स आणि एका सफरचंदाचं सेवन केलं तर तुमचं हृदय निरोग राहण्यासाठी मदत होते. खरं तर ओट्स शरीरामधील कोलेस्ट्रॉल घटवतं, त्यामुळे हृदयाचा आजारांपासून बचाव होतो. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी ओट्स आणि सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया फायदे : 

अनेक पोषक तत्वांचे प्रमुख स्त्रोत : 

ओट्स आणि सफरचंदामध्ये सोडिअम अत्यंत कमी प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर वाढत नाही आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. दोन्ही पदार्थांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पदार्थ खाल्याने पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे दिसतं. त्यामुळे तुम्ही ओवर इटिंगपासून दूर राहता. फायबर असणारे पदार्थ तुमचं वजन वाढू देत नाही. त्यामुळे आपण लठ्ठपणापासून दूर राहतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, लठ्ठपणाही हृदयरोगाचं प्रमुख लक्षण आहे. 

ओट्स 

ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतं. दररोज ओट्स खाल्याने शरीरामध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. याव्यतिरिक्त ओट्समध्ये ओमेगा 3 अ‍ॅसिडही असतं. जे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. ओट्समध्ये असलेलं फायबर आणि फॅट्स आरोग्यासाठी फायदेशीर समजले जातात. हे दोन्ही घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. दररोज ओट्स खाल्याने शरीरामध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर निघून जातात. ओट्समध्ये बीटा ग्लूटन असतं. हे एक प्रकारचं फिजियोकेमिकल असतं, जे शरीराचे अवयव आणि हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात.


 
सफरचंद 

सफरचंद एक असं फळ आहे, ज्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स आढळून येतात. जे संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. सफरचंदामध्ये असलेलं फायबर तुमचं वजन वाढवण्यापासून रोखतं. याव्यतिरिक्त सफरचंद पोटॅशिअमचाही उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. सफरचंदाच्या सेवनाने मेंदूचं आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. स्मरणशक्ती उत्तम राहते, दात आणि हिरड्या निरोगी राहतात तसेच पोटाच्या आजारांपासून बचाव होतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 


Web Title: Apple and oats are beneficial for heart health
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.