हा मराठी अभिनेता सर्वांचा लाडका अभिनेता आहे
साडी नेसलेला हा अभिनेता आणि त्याचा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत गाजला
या अभिनेत्याचं नाव आहे सुबोध भावे. बालगंधर्व सिनेमात सुबोध भावेने काम केलं होतं
या सिनेमात सुबोधने बालगंधर्वांची साकारलेली भूमिका अजरामर झाली
बालगंधर्व नाटकात स्त्री पात्र रंगवायचे. त्यामुळे सुबोधनेही या सिनेमात बालगंधर्वांनी साकारलेल्या काही स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या
बालगंधर्व सिनेमात सुबोधने साकारलेली भूमिका इतकी गाजली की त्याच्यावर पुरस्काराचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला
सुबोध भावेसोबत या सिनेमात विभावरी देशपांडे, अविनाश नारकर, अभिजीत केळकर या मराठी कलाकारांनी अभिनय केला होता