'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.
या मालिकेत तिने साकारलेल्या वहिनीसाहेब या भूमिकेमुळे ती आजही ओळखली जाते.
आजवर तिने 'माझिया प्रियाला प्रित कळेना',' रुंजी', 'जन्मगाठ', 'गंध फुलांचा गेला सांगून' तसेच 'तू चाल पुढं' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान, अभिनेत्री धनश्री काडगावकरने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत.
त्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्री चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर खास ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमधील अभिनेत्रीच्या लूकवर चाहते भाळले आहेत.