निवडणुकीतील यशानंतर थलापती विजयचा 'हा' चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये!

 ७ वर्षांपूर्वी झाला होता प्रदर्शित

थलापती विजयनं तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे.

यातच आता त्याचा ७ वर्षांपूर्वीचा एक थ्रिलर चित्रपट ओटीटीवर अचानक टॉप ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

हा एक स्पोर्ट्स ड्रामा असून यात विजयने दुहेरी भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाचं नाव आहे 'बिगिल'. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

 दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 विजयचा पडद्यावरील स्वॅग आणि त्याला मिळालेले राजकीय यश यामुळे 'बिगिल' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Click Here