सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो
लोकप्रिय मराठी अभिनेता किरण गायकवाड आणि त्याची पत्नी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सध्या गोव्यामध्ये व्हेकेशनचा आनंद घेत आहेत.
वैष्णवीनं गोव्यातील सुंदर फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
चाहत्यांना त्यांच्या या व्हेकेशनचे फोटो खूप आवडले असून, त्यांच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
दोघेही मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरे आहेत. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या दोघांनी गोव्याच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांवर वेळ घालवला.
किरण व वैष्णवीने गेल्या वर्षी १४ डिसेंबर २०२४ रोजी मालवणमध्ये मोठ्या थाटात लग्न केले होते.
या दोघांची पहिली भेट 'देवमाणूस' मालिकेच्या सेटवर झाली होती.
सध्या वैष्णवी ही स्टार प्रवाहवरील 'काजळमाया' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
तर किरण गायकवाड 'देवमाणूस' या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेतून पाहायला मिळत आहे.