मृणाल ठाकूरचा
 किलर लूक

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आलेत.

टीव्हीच्या दुनियेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी मृणाल ठाकूर आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

मृणालचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला. तिने तिचे शालेय शिक्षण सेंट जोसेफमधून पूर्ण केले आणि त्यानंतर उच्च शिक्षण वसंत विहार हायस्कूलमधून घेतले.

मृणालने तिच्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीची सुरुवात स्टार प्लसच्या 'मुझसे कुछ कहती... ये खामोशियां' या शोमधून केली.

'कुमकुम भाग्य' या मालिकेने मृणालला घराघरात प्रसिद्ध केले आणि ती प्रत्येक चाहत्याची लाडकी बनली.

बॉलिवूडमध्ये मृणालचा पहिला चित्रपट 'लव्ह सोनिया' होता. पण, तिच्या करिअरला खरी कलाटणी 'सुपर ३०' या चित्रपटाने दिली.

'सुपर ३०' चित्रपटानंतर मृणालच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट आला. जिथे तिने हृतिक रोशनसोबत काम करून तिची ओळख अधिक मजबूत केली.

'सीता रामम' आणि 'हाय नन्ना'सारख्या साउथ चित्रपटांमधील मृणालच्या अभिनयाने हे सिद्ध केले की ती पॅन इंडिया स्टार बनली आहे.

Click Here