अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्पेन व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत.
मधुराणी प्रभुलकर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
त्यानंतर आता मधुराणी रंगभूमीवर 'ज्याचा त्याचा विठ्ठ्ल' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
सध्या मधुराणी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या ती स्पेनमध्ये फेरफटका मारताना दिसते आहे.
सोशल मीडियावर मधुराणीने स्पेनमधील फोटो शेअर केले आहेत.
यावेळी तिने व्हाइट शर्ट आणि डेनिम पॅण्ट परिधान केली आहे. यात ती ग्लॅमरस दिसत आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.