अमृता खानविलकरचा हटके लूक चर्चेत
अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
अमृता अभिनेत्रीसह उत्तम डान्सरदेखील आहे. तिच्या नृत्याच्या दिलखेचक अदांवर चाहते घायाळ होताना दिसतात.
अमृता खानविलकर अनेकदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
अमृता खानविलकरने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक आणि ब्रॉंझ पट्टा असलेली साडी नेसली आहे. त्यावर तिने व्हाइट रंगाचा शर्ट परिधान केला आहे.
अमृताने साडीवर कानात मोठे इअररिंग्स, हातात गोल्डन मोठे बँगल्स, बोटात रिंग परिधान केलीय. कर्ली हेअर आणि गॉगल्स लावून तिने लूक पूर्ण केलाय.