अभिनेत्री सई ताम्हणकर हिने पुन्हा एकदा तिच्या फोटोंनी चाहत्यांना मोहित केले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर हिने पुन्हा एकदा तिच्या फोटोंनी चाहत्यांना मोहित केले आहे.
नुकतेच सईने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा पारंपारिक मराठमोळा लूक दिसून येत आहे.
या फोटोशूटमध्ये सईने पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यामुळे तिच्या सौंदर्याला एक खास आणि आकर्षक किनार मिळाली आहे.
साडीवर तिने पारंपारिक साजश्रृंगार केला आहे. गळ्यात गोल्ड ज्वेलरी, कानात झुमके, हातात गोल्डन बांगड्या आणि कपाळावर टिकली... असा तिचा संपूर्ण मराठमोळा थाट आहे.
नेहमी वेस्टर्न किंवा मॉडर्न लूकमध्ये दिसणाऱ्या सईचा हा पारंपरिक अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
सईचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत आणि फॅन्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 'अप्रतिम', 'सुंदर', 'क्वीन' अशा प्रतिक्रिया देत चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.