करण टॅकर आणि कल्की कोचलिनची नवीन सीरिज 'भय-द गौरव तिवारी मिस्ट्री'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:54 IST2025-12-09T18:53:40+5:302025-12-09T18:54:27+5:30
Karan Tacker and Kalki Koechlin : अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर लवकरच 'भय - द गौरव तिवारी मिस्ट्री' ही नवीकोरी वेबसीरिज दाखल होणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सीरिजमध्ये करण टॅकर गौरव तिवारीच्या भूमिकेत आणि कल्की कोचलिन आयरीन वेंकटच्या भूमिकेत दिसणार आहे.

करण टॅकर आणि कल्की कोचलिनची नवीन सीरिज 'भय-द गौरव तिवारी मिस्ट्री'
अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर लवकरच 'भय - द गौरव तिवारी मिस्ट्री' ही नवीकोरी वेबसीरिज दाखल होणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सीरिजमध्ये करण टॅकर गौरव तिवारीच्या भूमिकेत आणि कल्की कोचलिन आयरीन वेंकटच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त याा सीरिजमध्ये दानिश सूद, सलोनी बत्रा, शुभम चौधरी, आणि निमिषा नायर या उत्कृष्ट कलाकारांची टीम पहायला मिळणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केले आहे.
ट्रेलरची सुरुवात एका तणावपूर्ण जागेवरील शोध घेण्याने होते जी प्रेक्षकाला गौरव यांनी कधीतरी अनुभवलेल्या जगात थेट घेऊन जाते. अस्पष्ट हालचालींची लुकलुक, संकटात केलेले कॉल्स, बॅटऱ्या संपणे, अवतीभोवती आत्मा फिरणे, आणि विरोधाभासी कथा या गोष्टी त्यांनी पायलट म्हणून सुरु केलेला प्रवास आणि ते इंग्लंडमधील तत्वज्ञानविषयक चर्चकडे आकर्षित होऊन अखेरीस भारताचे पहिले पॅरानॉर्मल अधिकारी बनले असा जीवन बदलणारा अनुभव एकत्र दाखवितात. कथेत त्यांनी केलेले संघर्ष आधी पहायला मिळतात, नंतर सहकाऱ्यांना त्यांच्या बाबतीत आलेले संशय, कुटुंबाविषयी चिंता, आणि अज्ञात गोष्टींचा सामना करताना आलेला भावनिक बोजा इ. सादर केले आहे आणि हे सर्व वास्तविक प्रकरणांच्या फाइल्स आणि फील्ड नोट्सच्या माध्यमातून सांगितले गेले आहे. यासोबतच आयरीन वेंकट यांचा कथेचा प्रवास सुरू आहे, जिची भूमिका कल्की कोचलिनने साकारली आहे. ती एक लेखिका आणि पत्रकार आहे जिला सुरुवातीला खात्री नसते परंतु ३२ व्या वर्षी गौरवच्या अचानक निधनानंतर ती त्यांच्या जगात ओढली जाते. ती त्यांच्या शेवटच्या कार्यांचा पुन्हा तपास करताना आणि गौरव तिवारी व त्यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहून त्यांच्याकडून राहिलेले शोध पुन्हा पाहत असताना, मिथ्यांमागे असलेल्या माणसाबद्दलच्या खऱ्या सत्याची आणि आता त्याला परिभाषित करणाऱ्या वारशाची झलक ट्रेलर मधून दिसून येते.
करण टॅकरने म्हटले की, "मला आनंद आहे की मला भारताच्या पहिल्या अधिसामान्य (पॅरानॉर्मल) शोध घेणाऱ्याची भूमिका पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली आणि वास्तविक व विचित्ररीत्या अस्पष्ट, अशा दोन्ही जगात पदार्पण करण्याची संधी मिळाली, व प्रेक्षकांनी त्यांच्या मार्गाला आकार देणाऱ्या भावना, रहस्य आणि तीव्रता यांचा अनुभव घ्यावा, अशी उत्सुकता मला लागली आहे."
आयरीन वेंकटची भूमिका साकारणारी कल्की कोचलिन पुढे म्हणाली, "आयरीनचा प्रवास हा समजुतीच्या पलीकडे पाहण्याबद्दल आहे. सुरुवातीला तिच्या मनात शंका असते, परंतु गौरवच्या निधनानंतर जेव्हा तिला त्यांच्याबद्दल कळते तेव्हा तिला त्या अनेक स्तरांची जाणीव होते जे त्यांच्या जीवनाचा आणि कामाचा भाग होते. मला या भूमिकेकडे आकर्षित करणारा एक प्रमुख घटक म्हणजे तो भावनिक बदल होता. जिज्ञासा आणि असुरक्षिततेतील संतुलनाचा शोध मला आयरीन भूमिका साकारताना घेता आला आणि तो पडद्यावर सादर करणे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे." 'भय - द गौरव तिवारी मिस्ट्री' १२ डिसेंबरपासून फक्त अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम केली जाणार आहे.