टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ३३ व्या वर्षी झाली आई; मुलगी झाल्याने आनंदाला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 09:40 IST2025-12-07T09:37:30+5:302025-12-07T09:40:52+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री आई झाली असून तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्री आई झाल्याने चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तिचं अभिनंदन केलं आहे

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ३३ व्या वर्षी झाली आई; मुलगी झाल्याने आनंदाला उधाण
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'देवों के देव महादेव' मध्ये पार्वतीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया आई झाली आहे. सोनारिका आणि तिचा पती विकास पराशरच्या आयुष्यात नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. सोनारिकाने ५ डिसेंबर २०२५ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, आई झाल्याची ही गोड बातमी तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली.
लेकीच्या आगमनाने आनंंदाला उधाण
सोनारिका आणि तिचा पती विकास पराशरने इंस्टाग्राम अकाउंटवर मुलीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो असून, यामध्ये सोनारिका आणि विकास यांनी आपल्या हातांमध्ये लेकीचे चिमुकले पाय धरले आहेत. या भावनिक फोटोसोबत सोनारिकाने एक खास कॅप्शनही लिहिले आहे: "आमची सर्वात प्रिय आणि सर्वात मोठी प्रार्थना सफल झाली. तिच्या आगमानाने ती आत्तापासूनच आमचं संपूर्ण जग बनली आहे."
सोनारिकाने ही गुड न्यूज शेअर करताच, तिच्या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाविश्वातील तिच्या मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. लता सबरवाल, आरती सिंह, अशनूर कौर यांच्यासह अनेक कलाकारांनी सोनारिका आणि विकासला शुभेच्छा दिल्या आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी आई झालेल्या सोनारिकाने काही दिवसांपूर्वीच पतीसोबत मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती डिसेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याचे संकेत दिले होते.
सोनारिकाने फेब्रुवारी २०२४ मध्ये तिचा बॉयफ्रेंड विकास पराशरसोबत राजस्थानमधील रणथंभौर येथे मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. टीव्ही मालिकांसोबतच सोनारिकाने काही तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.