"खूप त्रास...", 'तुझ्यात जीव रंगला' फेम धनश्री काडगावकर पहिल्यांदाच झाली व्यक्त; म्हणाली-"मालिकेतील कलाकारांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:53 IST2025-11-11T17:49:48+5:302025-11-11T17:53:47+5:30
'तुझ्यात जीव रंगला' फेम धनश्री काडगावकरचं कठीण काळावर भाष्य, म्हणाली...

"खूप त्रास...", 'तुझ्यात जीव रंगला' फेम धनश्री काडगावकर पहिल्यांदाच झाली व्यक्त; म्हणाली-"मालिकेतील कलाकारांना..."
Danashree Kadgaonkar:धनश्री काडगावकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर तिने 'माझिया प्रियाला प्रित कळेना',' रुंजी', 'जन्मगाठ', 'गंध फुलांचा गेला सांगून' तसेच 'तू चाल पुढं' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. सध्या धनश्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.
गेल्या वर्षभरापासून धनश्री छोट्या पडद्यावर फारशी सक्रिय नाही. अलिकडेच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यादरम्यान, कलाकारासाठी संयम किती महत्वाचा असतो. एखादा कलाकार प्रेक्षकांसमोर बरेच दिवस आला नाहीतर, डोक्यात कोणते विचार येतात, असा प्रश्न विचारण्यात आला.या प्रश्नाचं उत्तर देताना धनश्री म्हणाली, "या परिस्थितीत खूप रडायला येतं. काय करणार ना तुम्ही पण,या सगळ्यात आपल्या सोबतीला कोणीतरी असावं लागतं तर तो माझा नवरा आहे. माझी प्रत्येक बाजू सांभाळायला तो आहे. तो मला मार्गदर्शनही करतो, त्याला या फिल्डबद्दल माहिती आहे."
पुढे धनश्री म्हणाली, "खरं सांगायचं झालं तर या सगळ्याचा त्रास होतो. म्हणजे मालिकेतील कलाकारांन रोज कॅमेरा बघणं त्या प्रोसेसमधून जाणं याची सवय झालेली असते. आणि अचानक तुम्ही काहीच करत नसाल तर तेव्हा वाईट वाटतं. पण, मला असं वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. हा काळ अनुभवणं, यातून जाणं हे गरजेचं आहे. त्यामुळे एक माणूस म्हणून तुमच्यामध्ये अनेक बदल होतात."
मालिका करणार नाही, असा निर्णय घेतला अन्...
"यापूर्वी २०१५-१६ मध्ये मी मालिका करायची नाही असा निर्णय घेतला होता. त्यावेळी गंध फुलांचा सांगून गेला नावाची मालिका करत होते. काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी तो निर्णय घेतलेला. त्याकाळात मी सुगरण नावाचा एक शो अॅकरिंग करत होते. तेव्हा माझ्या मैत्रीणी तिचा एक सिनेमा मला ऑफर केला होता. पण, मी जे ठरवंल ते तसं केलं. आता तू चाल पुढं नंतर मला काम करायचंच होतं. पण, वेळ आणि हा जो काळ आहे हेच मला काहीरी वेगळं करायला भाग पाडतंय." अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने यावर दिली.