"तू एकटाच पुरुन उरतोस रंगमंचावर!", प्रियदर्शनी इंदलकरने समीर चौघुलेचं केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:31 IST2025-12-09T15:30:33+5:302025-12-09T15:31:47+5:30
Priyadarshini Indalkar praised Sameer Chaughule : सध्या समीर चौघुलेचे ‘सम्या सम्या मैफ़िलीत माझ्या’चे जगभरात प्रयोग सुरू आहेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ‘सम्या सम्या मैफ़िलीत माझ्या’चा प्रयोग पाहिला आणि सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले.

"तू एकटाच पुरुन उरतोस रंगमंचावर!", प्रियदर्शनी इंदलकरने समीर चौघुलेचं केलं कौतुक
छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा शोने रसिकांचे पूरेपूर मनोरंजन केलं आहे. या शोमधील अनेक विनोदवीर घराघरात पोहचले आहेत. या शोमधून समीर चौघुलेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. सध्या समीर चौघुलेचे ‘सम्या सम्या मैफ़िलीत माझ्या’चे जगभरात प्रयोग सुरू आहेत आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ‘सम्या सम्या मैफ़िलीत माझ्या’चा प्रयोग पाहिला आणि सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले.
प्रियदर्शनी इंदलकरने समीर चौघुलेसोबतचे फोटो शेअर करत अभिनेत्याचे कौतुक केले. तिने लिहिले की, ''अत्यंत साधा, सरळ आणि सामान्य जगण्यातला विनोद ही तुझी खासियत आहेच, दादा! आणि हीच विनोदशैली अनुभवताना दोन अडीच तास कधी संपतात लक्षात येत नाही. स्वतःवर हसणं किती महत्वाचं आहे आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींची गंमत घेता येणं, आयुष्याला कसं सुंदर बनवतं, याची आठवण करुन देण्यासाठी थैंक्स! मी नेहमीच स्वतःला भाग्यवान समजते की तुझ्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.''
'''सम्या सम्या मैफ़िलीत माझ्या' या कार्यक्रमाचा जगभरातील प्रतिसाद पाहुन खूप अभिमान वाटतो! लोकांचं न थांबणारं हसु ऐकून खरंच पोट भरल्यासारखं वाटतं.. खूप प्रेम आणि प्रचंड शुभेच्छा !! तुम्हीही हा कार्यक्रम पाहा आणि समीर चौघुलेसोबत नॉस्टॅल्जिक रोलर कोस्टर राइड अनुभवा. आणि हो, तू एकटाच पुरुन उरतोस रंगमंचावर!', असे तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.