Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 21:24 IST

'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. याशिवाय लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार कोणता स्पर्धक आघाडीवर आहे, जाणून घ्या

'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. गेल्या १०० दिवसांपासून टेलिव्हिजनवर 'बिग बॉस १९' चर्चेत आहे. अखेर आज शो अखेरच्या टप्प्यावर आला आहे. 'बिग बॉस १९' कोण जिंकणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. हॉटस्टारवर 'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १९'मध्ये टॉप ५ स्पर्धकांपैकी वोटिंग ट्रेंडनुसार कोण आघाडीवर आहे,  जाणून घ्या. हा स्पर्धक ट्रॉफी जिंकण्याची शक्यताफॅन्सने शेअर केलेल्या सोशल मीडिया ट्रेंडनुसार, 'बिग बॉस १९'मध्ये गौरव खन्ना आघाडीवर आहे. गौरवच्या मागोमाग गायक अमाल मलिक दुसऱ्या स्थानावर तर फरहाना भट तिसऱ्या स्थानावर आहे. मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आणि अभिनेत्री तान्या मित्तल हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. त्यामुळे वोटिंग ट्रेंडनुसार गौरव खन्ना ट्रॉफी जिंकण्याची शक्यता आहे. याबाबतचं चित्र लवकरच स्पष्ट होईल.

'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात

'बिग बॉस १९'च्या सुरुवातीला पाचही स्पर्धक हॉलच्या एरियात जमले होते. 'बिग बॉस १९'मध्ये आवडत्या जागेसाठी स्पर्धकांना मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी प्रणित, गौरव, तान्या, फरहाना आणि अमाल या पाचही स्पर्धकांसाठी घरातील आवडत्या जागेसाठी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

त्यानंतर बिग बॉसने पाचही जणांसाठी शँपेन मागवलं होतं. गौरवने शँपेनचं झाकण उघडून सर्वांसाठी ग्लास भरले. सर्व स्पर्धकांनी एकमेकांना चिअर्स करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी कोण जिंकणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ‘Bigg Boss 19’ Grand Finale Begins: Voting trends favor this contestant.

Web Summary : ‘Bigg Boss 19’ grand finale commences after 100 days. Voting trends suggest Gaurav Khanna leads, followed by Amaal Malik and Farhana Bhat. Praneet More and Tanya Mittal are in fourth and fifth position, respectively. Final results are awaited.
टॅग्स :बिग बॉस १९सलमान खानटेलिव्हिजनटिव्ही कलाकार