“एक हजारो में मेरी बहना है”, अजितदादांचा Video पाहून भर कार्यक्रमात रडल्या सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:59 PM2023-09-11T13:59:45+5:302023-09-11T13:59:45+5:30

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’मधील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Supriya Sule gets emotional after watching ajit pawar video khupte tithe gupte | “एक हजारो में मेरी बहना है”, अजितदादांचा Video पाहून भर कार्यक्रमात रडल्या सुप्रिया सुळे

“एक हजारो में मेरी बहना है”, अजितदादांचा Video पाहून भर कार्यक्रमात रडल्या सुप्रिया सुळे

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा लोकप्रिय शो आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमात कलाविश्वातील सेलिब्रिटींसह राजकीय नेतेही सहभागी होताना दिसतात. ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना अवधूत त्याच्या खास शैलीत प्रश्न विचारुन बोलतं करतो. या कार्यक्रमात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’मधील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवारांनी भाजपाबरोबर सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे सुप्रिया सुळे दुखावल्या गेल्या होत्या. याबद्दल त्यांनी कधी उघडपणे भाष्य केलं नाही. परंतु, ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये त्या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सुप्रिया सुळेंना अजित पवारांबरोबरचे काही फोटो दाखविण्यात आले. अजित पवारांबरोबरच्या फोटोंचा व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर झाले. कॅमेऱ्यासमोरच सुप्रिया सुळे रडू लागल्या. ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमातील व्हिडिओ झी मराठीच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये सुप्रिया सुळेंआधी 'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत बिचुकलेंनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, संजय राऊत, नारायण राणे या राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती.

Web Title: Supriya Sule gets emotional after watching ajit pawar video khupte tithe gupte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.