मजा! सोहम-पूजा आज सप्तपदी घेणार, हळद-संगीत फंक्शनमध्ये नवरीच्या डान्सवर खिळल्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:02 IST2025-12-02T10:01:00+5:302025-12-02T10:02:01+5:30
नवरीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मजा! सोहम-पूजा आज सप्तपदी घेणार, हळद-संगीत फंक्शनमध्ये नवरीच्या डान्सवर खिळल्या नजरा
आदेश बांदेकरांचा मुलगा सोहम आज लग्नबंधनात अडकणार आहे. टीव्ही अभिनेत्री पूजा बिरारीसोबत तो आयुष्यभराची गाठ बांधणार आहे. कालच दोघांची हळद उत्साहात झाली. तर रात्री संगीत फंक्शनही जल्लोषात पार पडलं. मुंबई नाही तर लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये त्यांचं हे ग्रँड वेडिंग आहे. या लग्नाला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान काल हळद आणि संगीत फंक्शनमध्ये पूजा आणि सोहमने चांगलीच धमाल केली. नवरीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरच्या हळदीचे फोटो समोर आले आहे. पिवळ्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये पूजा खूप सुंदर दिसत आहे. तर सोहमनेही मॅचिंग कुर्ता पायजमा घातला आहे. दोघांनी हळदीसाठी स्टायलिश एन्ट्री घेतली. तसंच समारंभात दोघंही वेगवेगळ्या गाण्यांवर पाहुण्यांसोबत थिरकताना दिसले. रात्री त्यांचा संगीत सोहळा होता. यासाठी पूजा सिव्हर वेस्टर्न ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तर सोहमनेही सिल्व्हर आऊटफिट परिधान केला होता. दोघांनी संगीत परफॉर्मन्सही दिला.
सोहम आणि पूजाने वेडिंगसाठी 'मजा' हॅशटॅग ठेवलं आहे. सुकन्या मोने, सचित पाटील, अभिजीत केळकर, ऋजुता देशमुख, अजित परब, सुमीत राघवन, दिपाली विचारे अशा अनेक कलाकारांनी लग्नापूर्वीच्या फंक्शन्समध्ये हजेरी लावली. तर आज इतरही कलाकार सोहम आणि पूजाला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत.
पूजा बिरारी सध्या 'स्टार प्रवाह'वर 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिची मंजिरी ही भूमिका आहे. तर विशाल निकम रायाच्या भूमिकेत आहे. मालितेतही राया-मंजिरीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. खऱ्या आयुष्यात आणि मालिकेत दोन्ही ठिकाणी पूजा लग्नबंधनात अडकणार आहे. तर दुसरीकडे सोहम निर्मितीसंस्था सांभाळत आहे. सोहम प्रोडक्शन्स अंतर्गत 'ठरलं तर मग' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेची निर्मिती करत आहे.