Join us

शगुफ्ता अली दिसणार 'या' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 15:59 IST

झोया आणि आदित्य एकत्र येऊन नवीन जीवनाचा प्रारंभ करत आहेत याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पण त्यांच्या जीवनातील समस्या अजून संपलेल्या नाहीत असे दिसत आहे.

कलर्सच्या बेपनाहमध्ये दोन अनोळखी व्यक्तींची झोया (जेनिफर विंगेट) आणि आदित्य (हर्षद चोपडा) प्रेम काहाणी कहाणी आहे. ज्यात ते दोघे नशीबाच्या फटकाऱ्याने एकत्र येतात आणि त्यांची कहाणी प्रेक्षकांना आवडली आहे. झोया आणि आदित्य एकत्र येऊन नवीन जीवनाचा प्रारंभ करत आहेत याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पण त्यांच्या जीवनातील समस्या अजून संपलेल्या नाहीत असे दिसत आहे.

हूडा मॅन्शनमध्ये झोयाने प्रवेश केल्यापासून ती तिच्या नव्या कुटुंबाला खुलविण्याचा प्रयत्न करत आहे. पण एक अनोळखी व्यक्ती तिच्यावर बारीक नजर ठेवून आहे आणि तिला भयानक परिणाम होणारे संकटाचे संदेश पाठवत आहे. वेगवेगळ्या परिस्थितीतून गेल्यानंतर, झोयाला वाटते की यामागे अंजनाचा (परिणाती बोथाकूर) हात असला पाहिजे, जिला ती अजिबात आवडत नाही. पण जेव्हा तिला ही व्यक्ती दुसरीच कोणी आहे हे सत्य कळते तेव्हा तिला धक्का बसतो. कथे मध्ये एक रोमांचक कलाटणी आणणार आहे शगुफ्ता अलीचा प्रवेश, जी राजवीरची (अप्रूवा) नानी आहे. ती झोया द्वारे हूडा कुटुंबाला लक्ष बनवत तिचा सूड उगवण्याचा प्रयत्न करणार आहे.

शो मधील तिच्या प्रवेशा विषयी बोलताना शगुफ्ताने सांगीतले, “टेलिव्हिजन वरील सर्वात जास्त लाडक्या शो मधील एक असलेल्या कलर्सच्या बेपनाह मध्ये पुनरागमन करताना मी उत्तेजित झाले आहे. पुन्हा एकदा सिनेव्हिस्टा प्रॉडक्शन सोबत काम करताना मला आनंद होत आहे. माझ्या प्रवेशाने कथे मध्ये एक नवीन कलाटणी येणार आहे आणि त्यामुळे झोयाच्या सुंदर जीवनात व्यत्यय येणार आहे तसेच संपूर्ण हूडा कुटुंबात सुध्दा. या टॅलेंटेड टीम सोबत काम करण्याची आणि तेथे माझा वेळ अतिशय छान जाईल असे मला वाटते आहे.”