श्र्रेयस म्हणतोय... पडदा ना हटाओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 02:56 IST2016-03-18T09:54:52+5:302016-03-18T02:56:44+5:30
परदे क ो रेहेने दो.. परदा ना हटाओ... परदा जो उठ ...

श्र्रेयस म्हणतोय... पडदा ना हटाओ
परदे क ो रेहेने दो.. परदा ना हटाओ... परदा जो उठ गया तो राज खुल जायेगा.. हे गाणे सध्या आपला चॉकलेट बॉय श्रेयस तळपदेला म्हणावेसे वाटतेय. आता असे काय गुपित आहे कि तो हे गाणे गातोय. तर त्याचे झाले असे की, श्रेयसने एक फोटो सोशल साईटवर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये त्याच्याशेजारी एक मुलगी बसली असुन ती आपला चेहरा कपड्याने झाकत असल्याचे दिसत आहे. आता ही कोण मुलगी आहे जी समोर येत नाहीये. अन श्रेयस पण म्हणतोय कि पडदे मे रेहेने दो. कदाचित श्रेयसच्या नव्या सिनेमाची हिरोईन तर नसेल ना कि जिला तो सगळ््यांपासुन दुर ठेवत आहे अन चित्रपट रिलिझिंग पर्यंत हे राज ओपन करु नकोस हेच या गाण्यातून कदाचित सांगतही असेल. एवढेच नाही तर तो तिला लिडींग लेडी सुद्धा म्हणतोय. आता श्रेयसची ही लीडींग लेडी कोण आहे हे पाहणे खरच औत्स्युक्याचे ठरेल.