नितीन गडकरींना भेटून संकर्षण कऱ्हाडे भारावला, मिळाली 'ही' खास भेट! अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 09:08 IST2025-10-16T09:07:35+5:302025-10-16T09:08:31+5:30
नितिन गडकरी यांनी संकर्षणला खास भेटवस्तूही दिली.

नितीन गडकरींना भेटून संकर्षण कऱ्हाडे भारावला, मिळाली 'ही' खास भेट! अभिनेता म्हणाला...
संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संकर्षणला आपण विविध सिनेमे, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. संकर्षण रंगभूमीवरही सक्रीय असतो. तो सोशल मीडियावर विविध पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचं अपडेट तो चाहत्याना देत असतो. अशातच संकर्षणने एक नवीन पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये थेट केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत दिसून येत आहे. या खास भेटीदरम्यान नितिन गडकरी यांची संकर्षणला खास भेटवस्तूही दिलीय.
नुकतंच संकर्षणनं नितिन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नितीन गडकरी यांनी संकर्षणला India Aspires हे त्यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं. या पुस्तकाच्या पहिल्या पानावर नितीन गडकरींनी स्वत:ची स्वाक्षरी देखील केली आहे. या भेटीदरम्यान काय-काय गप्पा मारल्या याबाबत संकर्षणने पोस्टमधून सांगितलं. त्याने लिहलं, "आज दिल्ली मध्ये नितीन गडकरी साहेबांची भेट झाली… त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक, स्वाक्षरी करुन भेट म्हणून दिलं. त्यांच्या भेटीसाठी मिळालेल्या अर्ध्या तासाच्या वेळेत गप्पांचे विषय हे घर, घरातली माणसं, लिखाण, नागपूर, दिल्ली आणि “खाणं…” असे चौफेर होते. वाह! मज्जाच आली… थँक्यू सर! ही खास भेट घडवून आणल्याबद्दल आमचे मित्र अंकित यांचे आभार!". संकर्षणने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
संकर्षण कऱ्हाडे हा गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. तो केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर उत्कृष्ट कवी सुद्धा आहे. 'संकर्षण व्हाया स्पृहा' या कवितांच्या कार्यक्रमातून तो रसिकांचं मनोरंजन करत असतो. निवडणुकीच्यावेळी त्यानं लिहलेली कविता प्रचंड गाजली होती. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी संकर्षणचं कौतुक केलं होतं. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर त्याला शिवतीर्थावर बोलावून कौतुक केलं होतं.